CET Exam Result esakal
नाशिक

CET Result : सीईटी निकालांचा पुढील आठवड्यात धडाका; विविध 8 अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश परीक्षांचे निकाल होणार जाहीर

CET Result : बारावीचा निकाल जाहीर झाल्‍यानंतर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे वेध लागलेले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

CET Result : बारावीचा निकाल जाहीर झाल्‍यानंतर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे वेध लागलेले आहेत. विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी यापूर्वीच सीईटी परीक्षा पार पडल्‍या असून, अनेक परीक्षांचे निकाल अद्याप प्रलंबित आहेत. पुढील आठवड्यात १० जूनपासून सीईटी परीक्षांच्‍या निकालाचा धडाका सुरू होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशासाठी मार्च महिन्‍यापासून टप्प्‍याटप्प्‍याने सीईटी परीक्षा पार पडत आहेत. ( CET results will be declared next week)

वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी एकूण २२ सीईटी परीक्षांचे आयोजन सीईटी सेलतर्फे केले होते. यापैकी दहापेक्षा अधिक सीईटी परीक्षांचे निकाल यापूर्वीच जाहीर झालेले आहेत. सर्वाधिक विद्यार्थिसंख्या असलेल्‍या एमएचटी-सीईटी यांसह अन्‍य काही सीईटी परीक्षांच्‍या निकालाची विद्यार्थी, पालकांना प्रतीक्षा लागून आहे. प्रवेशप्रक्रियेचे नियोजन करायला सोपे व्‍हावे, या उद्देशाने सीईटी सेलने निकालाच्‍या संभाव्‍य तारखांची घोषणा केली आहे. त्‍यानुसार आता पुढील आठवड्यापासून निकालाचा धडाका सुरू होणार आहे.

पदव्युत्तरच्‍या प्रवेशाकडे लक्ष

इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झालेला असल्‍याने पदवी स्‍तरावरील अभ्यासक्रमाच्‍या प्रथम वर्षास प्रवेशाचा मार्गदेखील मोकळा झाला आहे. मात्र राज्‍यातील अनेक विद्यापीठांकडून पदवीच्‍या अंतिम वर्षाचे निकाल जाहीर केलेले नाही. अशात पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्‍या सीईटी परीक्षांचा निकाल जाहीर झाला तरी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना पदवीच्‍या निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. आता या निकालास किती विलंब होतो, याकडे लक्ष लागून राहणार आहे. (latest marathi news)

सीईटी परीक्षा निकालाची संभाव्‍य तारीख

एमएचटी-सीईटी १० जून

बीए/बीएस्सी-बीएड सीईटी १२ जून

बीएचएमसीटी सीईटी ११ जून

डीपीएन/पीएचएन १२ जून

एमएचएमसीटी-सीईटी १३ जून

नर्सिंग सीईटी १६ जून

एलएलबी (५ वर्षे) सीईटी १६ जून

बीबीए, बीसीए सीईटी १७ जून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : एरंडोलमध्ये ८२ सार्वजनिक गणेश मंडळांकडून उत्साहात गणरायाची स्थापना

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT