येवला : येवला, लासलगाव, नांदगाव, वैजापूर परिसरात जबरी चोरी करून चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरजिल्ह्यातील दोन सराईतांना येवला तालुका पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ८ लाख ३५ रुपये किंमतीचे १०५ ग्रॅम वजनाचे सोन्याच्या दागिने व एक दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे अशी माहिती तालुका पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. मानोरी येथील सोनाली शेळके या त्यांच्या स्कूटीने येवला ते नाशिक रोडने घरी जात असताना मुखेड फाट्यामागे पाठीमागून काळ्या रंगाच्या पल्सरवर आलेल्यांनी बळजबरीने ४ तोळे वजनाची १ लाख १० रुपये किंमतीची सोन्याची पटीपोत ओझून नाशिककडे धूम ठोकली. (Chain snatching duo caught arrested with gold worth 8 lakhs )
याबाबत येवला तालुका पोलिस ठाण्याला चोरीचा गुन्हा दाखल आहे. या घटनेच्या तपासात पोलिसानी आजूबाजूला घडलेल्या घटनाची माहिती घेतली तसेच सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तपास सुरू असताना दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात संशयित पोलिसांच्या हाती लागले असून त्यांनी चैन स्नॅचिंगची कबुली दिली आहे.
तालुका पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर, राजेंद्र बिन्नर, सचिन वैरागर, पंकज शिंदे, नितीन पानसरे, सागर बनकर, गणेश बागूल यांच्या पथकाने दुचाकी चोरीतील संशयित आरोपी संजय रमेश बाबरे (२९, लोणी, ता. राहता, जि. नगर) व राहुल रमेश मावस (वय -२५,नादी, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांना ताब्यात घेतले.
त्यांना ताब्यात घेऊन अधिक विचारणा केली असता त्यांनी येवला तालुका, लासलगाव, नांदगाव व वैजापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून स्नॅचिंगचे सहा गुन्हे व एक दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात येवला तालुका पोलिसांना यश आले आहे.
त्यांच्याकडून ४ तोळे वजनाची २ लाख ८० हजार रुपयांची पोत, एक तोळे वजनाची ७० हजार रुपयांची पोत, एक तोळे वजनाची ७० हजार रुपयांची पोत, तीन तोळे वजनाचा २ लाख १० हजार रुपये किंमतीचा पोहेहार, दीड तोळा वजनाची १ लाख ५ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी व १ लाख किमतीची काळ्या रंगाची बजाज पल्सर असा एकूण ८ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.