Faithful Bhushanraj Talekar and Dr. Prashant Devre with his family.
Faithful Bhushanraj Talekar and Dr. Prashant Devre with his family.  esakal
नाशिक

Saptashrungi Devi Chaitrotsav : सप्तशृंगी मातेच्या कीर्तीध्वजाची लाखो भाविकांच्या उपस्थित मिरवणूक

दिगंबर पाटोळे

वणी : रखरखत्या उन्हात, घामाच्या धारांनी आदिमायेच्या भक्तीत चिंब होत, आई भगवतीच्या भेटीसाठी माहेरहून आलेल्या पदयात्रेकरुंसह सुमारे दोन लाखांवर भक्त सप्तशृंगगडावर भक्तीसागरात दंग झाले. दरम्यान, सोमवारी (ता. २२) दुपारी आदिमायेच्या किर्तीध्वजाचे ट्रस्ट कार्यालयात विधीवत पूजन होवून ढफ-ढोलाच्या गजरात उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. रात्री १२ वाजता मध्यरात्री गडाच्या शिखरावर किर्तीध्वज फडकल्यानंतर खान्देशवासीयांनी ध्वजाचे दर्शन घेत गड सोडला. (Nashik Chaitrotsav procession of Saptashrungi Devi kirtidhwaj news)

आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री सप्तशृंगी माता चैत्रौत्सवादरम्यान आजची चतुर्दशी (चौदस) निमित्त आदिमायेच्या दर्शनासाठी खान्देशवासियांच्या दृष्टीने विशेष महत्व असल्याने लाखावर पदयात्रेकरु सप्तशृंगीचा जयघोष, ढोल-ताशांचा निनादात अनवाणी आलेल्या पदयात्रेकरूंची पावले कुठल्याही प्रकारचा थकवा न जाणवता मोठ्या उत्साहाने सप्तशृंगगड चढून जात होती.

पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. यात्रेकरुंची गर्दी उत्तरोत्तर वाढत जाऊन दर्शनासाठी बाऱ्या लागल्या होत्या. सकाळी ७.३० वाजता देवीच्या अलंकारांची ढोल- ताशाच्या गजरात विश्‍वस्त कार्यालयातून मिरवणूक काढण्यात आली. श्री भगवतीची पंचामृत महापूजा विश्‍वस्त भूषणराज तळेकर व विश्‍वस्त डॉ. प्रशांत देवरे यांनी सपत्नीक केली. (latest marathi news)

यांच्या हस्ते झाली पूजा

किर्तीध्वजाची विधिवत पूजा देवी संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश बाबासाहेब वाघ, तहसीलदार रोहिदास वारुळे, विश्‍वस्त मंडळ प्रतिनिधी अॅड. ललित निकम, डॉ. प्रशांत देवरे, भूषणराज तळेकर, विश्‍वस्त ॲड. दीपक पाटोदकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सूर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक कुलकर्णी, पोलिस निरीक्षक सोपान शिरसाठ, ध्वजाचे मानकरी एकनाथ गवळी व कुटुंबीय, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, पोलिस पाटील शशिकांत बेनके आदींच्या हस्ते झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT