Nashik Traffic Change esakal
नाशिक

Nashik Traffic Management : कपालेश्वर मंदिराकडे रस्त्यावरील वाहतूक मार्गात बदल; शहर वाहतूक शाखेचे नियोजन

Traffic Management : श्री. कपालेश्वर मंदिराकडे जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत, तर पर्यायी मार्गांनी वाहतुकीचे नियोजन करण्यात आलेले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाशिवरात्री (mahashivratri) निमित्ताने गोदाघाटावरील श्री. कपालेश्वर मंदिरात भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर श्री. कपालेश्वर मंदिराकडे जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत, तर पर्यायी मार्गांनी वाहतुकीचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्या मार्गांवर वाहनचालकांनी वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी केले आहे. (nashik Change in road traffic route on mahashivratri marathi news)

येत्या शुक्रवारी (ता.८) महाशिवरात्र आहे. तर, नंदी नसलेले एकमेव महादेवाचे मंदिर असलेले श्री कपालेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. महाशिवरात्रीला या मंदिरात भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी असते. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता.८) पहाटे ५ वाजेपासून ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत कपालेश्वर मंदिराकडे येणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद असतील.

तसेच, कपालेश्वर मंदिरापासून पंचवटी कारंजा, ढिकले वाचनालय, सरदार चौक, काळाराम मंदिर या मार्गे मिरवणूक काढली जात असते. यामुळेही वाहतूक कोंडीची शक्यता असते. तरी वाहनाचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याबाबतची अधिसूचना शहर वाहतूक शाखेतर्फे जारी करण्यात आलेली आहे. (Latest Marathi News)

प्रवेश बंद मार्ग

- ढिकले वाचनालयाकडून कपालेश्वर मंदिराकडे जाणारा मार्ग

- मालेगाव स्टॅण्डकडून कपालेश्वर मंदिराकडे जाणारा मार्ग

- सरदार चौकांकडून जाणारा मार्ग

- गाडगे महाराज पुलाकडून कपालेश्वर मंदिराकडे जाणारा मार्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : "...तर सेवेचा राजीनामा द्या अन् संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा"; राज ठाकरेंची IPS विश्वास नांगरे पाटलांवर टीका

Malvan Swimming Pool VIDEO : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून मारली उडी, डोकं तळाशी जोरात आपटलं, 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

Latest Marathi News Live Update : विशाळगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

Mumbai Water Supply: मुंबईवर कपातीचे संकट! धरणांनी गाठला तळ, अत्यल्प पावसामुळे चिंता

Video Viral: जग पाहता येत नाही... पण बापाच्या शब्दांनी रोनाल्डोचा गोल अनुभवला; लेकाची रिअ‍ॅक्शन डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT