Chhagan Bhujbal esakal
नाशिक

Chhagan Bhujbal : आधी मतदारसंघांची वाटणी, नंतर उमेदवारनिश्चिती होणार : भुजबळ

Chhagan Bhujbal : महायुतीतील तिन्‍ही प्रमुख पक्षांचे नेते सध्या मतदारसंघाचा गोशवारा घेत असून, बऱ्याचअंशी एकमत झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Chhagan Bhujbal : महायुतीतील तिन्‍ही प्रमुख पक्षांचे नेते सध्या मतदारसंघाचा गोशवारा घेत असून, बऱ्याचअंशी एकमत झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार एकत्र बसून अंतिम निर्णय घेतील. उमेदवारीबाबत जर-तरच्‍या चर्चा निरर्थक असून, आधी मतदारसंघांची वाटणी होईल व त्‍यानंतर सक्षम उमेदवारांच्‍या निवडीवर विचार केला जाईल, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी (ता. २६) झालेल्‍या पत्रकार परिषदेत सांगितले. (nashik Chhagan Bhujbal statement of First constituencies will be divided marathi news)

शिवसेनेच्‍या शिंदे गटाइतक्‍या जागा आम्हालाही द्याव्‍यात, इतकीच आमची मागणी आहे. भुजबळ कुटुंबीयांच्‍या मागणीसाठी आग्रही नसल्‍याची स्‍पष्‍टोक्‍ती त्‍यांनी दिली. माध्यमांनीच आपले नाव चर्चेत आणल्‍याचा दावा त्‍यांनी केला. जसे कार्यकर्ते नावे सुचवतात, तसेच माध्यमांनाही नाव सुचविण्याचा अधिकार आहे, असे ते म्‍हणाले. महादेव जानकर महायुतीकडून निश्‍चित निवडणूक लढवतील, अशी खात्री आहे. ती जागा कुठल्‍या पक्षाने द्यायची, याचा उलगडा एक-दोन दिवसांत होईल, असेही श्री. भुजबळ म्‍हणाले. (latest marathi news)

‘ती’ भेट राजकीय नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या घेतलेल्‍या भेटीसंदर्भात श्री. भुजबळ म्‍हणाले, की त्‍यांच्‍याकडे नगरविकास खातेही असून, या खात्यांतर्गत सिडको ही संस्‍था येते. सिडको संस्‍थेअंतर्गत आमच्‍या शैक्षणिक संस्‍थेच्‍या शाळेची जागा असून, त्‍यासंदर्भातील प्रश्‍न सोडविण्याच्‍या उद्देशाने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. शिवसैनिकांनी अस्‍वस्‍थ होण्याचे काहीही कारण नाही, अशी मिश्‍कील टिपणीदेखील त्‍यांनी केली.

मनसेमुळे पेचप्रसंग नाही

महायुतीत मनसेच्‍या सहभागाविषयी ते म्‍हणाले, की मनसेमुळे कुठेही पेचप्रसंग निर्माण झालेला नाही. याउलट मनसेमुळे महायुतीची शक्‍ती वाढणार आहे. अडचण करण्यासाठी ते आमच्‍याबरोबर आलेले नाहीत, असे त्‍यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France unrest Explained: फ्रान्स का पेटला? 'Block Everything' म्हणजे काय अन् मॅक्रो राजीनामा देणार का?

Rajgad Crime : रानडुक्कर शिकार प्रकरणी सात जण अटकेत; राजगड तालुक्यातील बोरावळे गावात घडला प्रकार

Nepal Violence: 'जेन-झीं'नी निवडला देशाचा नेता! माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांच्याकडे नेतृत्वाची धुरा

Jalna News : समृद्धी महामार्गावर चोरीच्या उद्देशाने ‘ठोकले खिळे’ सोशल मीडिया व प्रसार माध्यमावर व्हिडीओ व्हायरल मुळे खळबळ

Latest Marathi News Updates Live: रानडुक्कर शिकारप्रकरणी सात जण अटकेत

SCROLL FOR NEXT