नाशिक

गोदाकाठावरून ऑइल पेंट टाकली नावे

CD
H35101 नाशिक ः पवित्र रामतीर्थावरील घडीव दगडांवर छटपूजेच्या जागेसाठी उत्तर भारतीय नागरिकांनी टाकलेली नावे. --- छटपूजेच्या जागेसाठी गोदाघाटाचे विद्रुपीकरण --- नाशिककर संतप्त ः पायऱ्यांवर ऑइल पेंटने टाकली नावे; मनसे आक्रमक, प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १५ : छटपूजेसाठी रविवारी (ता. १५) गोदाकाठावर आलेल्या काही भाविकांनी आदल्या दिवशी रामतीर्थ परिसरातील ऐतिहासिक दगडी घाटांच्या पायऱ्यांवर ऑइल पेंटने स्वतःची नावे आणि खुणा करून, तसेच रंगाने पट्टे मारून जागा आरक्षित केल्याचा प्रकार समोर आल्याने नाशिककर संतप्त झाले आहेत. घाटावर झालेल्या या प्रकारामुळे पवित्र घाटांचे विद्रुपीकरण झाल्याने शहरात या विषयावरून चांगलाच वाद पेटला आहे. छटपूजा हा सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याचा पारंपरिक धार्मिक सण आहे. या पूजेला विरोध नसून सार्वजनिक आणि ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान करून जागेवर स्वतःचा हक्क सांगण्याच्या प्रवृत्तीला विरोध असल्याची भूमिका गोदाप्रेमींकडून मांडली जात आहे. रामतीर्थ परिसरातील घाटांचा ऐतिहासिक वारसा मोठा आहे. अशा ऐतिहासिक वारशाच्या ठिकाणी रंगाने नावे लिहिण्याचा प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी उत्तर भारतीयांवर कारवाई न झाल्यास प्रशासकीय कार्यालयासमोर ऑईल पेंट आणून ओतण्यात येईल, अशी भूमिकाही कार्यकर्त्यांनी घेतल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सणाचा आदर, पण कृत्य निंदनीय मनसेचे पदाधिकारी मनोज घोडके यांनीही याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली असून घाटावर नावे लिहिण्याच्या प्रकाराबाबत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. सामाजिक स्तरातूनही सार्वजनिक घाटांवर अशा प्रकारे नावे लिहून जागा अडविण्याच्या प्रकाराला विरोध दर्शविला जात आहे. या प्रकरणाचे पडसाद केवळ नाशिकपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. पिंपरी- चिंचवड, बदलापूर आदी ठिकाणीही छटपूजेच्या आयोजनातील सार्वजनिक जागांच्या वापरावरून वाद निर्माण झाले आहेत. छटपूजेच्या धार्मिक परंपरेचा सन्मान राखतानाच ऐतिहासिक वारसा आणि सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रशासनाने पार पाडावी, अशी मागणी होत आहे. --- कोट गोदाकाठावर घडलेल्‍या प्रकाराची माहिती घेऊ. छटपूजेसाठी नवीन पद्धत पाडायला नको. उत्तर भारतीय उत्‍साहात हा सण साजरा करीत असतात, परंतु या उत्‍साहात घाटांवर नाव टाकणे, रुमाल टाकून जागा आरक्षित करणे चुकीचे आहे. हा पायंडा पाडायला नको. - गिरीश महाजन, पालकमंत्री --- गोदावरीचे स्‍वरुप, सौंदर्यात बाधा आणणारे, नदी प्रदूषित करणारे कुठलेही कृत्‍य घडायला नको. प्रशासन व सरकार रामतीर्थाचे सौंदर्य वाढविण्यासाठी अथक परिश्रम घेत आहे. असे असतांना पूजेसाठी रंगाचा वापर करुन नावे लिहित विद्रूपिकरण करणे चुकीचे आहे. यासंदर्भात प्रशासन निश्‍चित कारवाई करेल. - प्रा. देवयानी फरांदे, आमदार --- ऑईलपेंटने नावे टाकल्याने गोदाघाटावर विद्रुपीकरण झाले आहे. अहिल्याबाई होळकर, बाजीराव पेशवा, गोपिकाबाई पेशवा यांनी घाट बांधले. त्यांची नावे घाटाला नाहीत आणि हे बाहेरून आलेले लोक जागा कशी आरक्षित करू शकतात. घाटावरील रंग काढणे, नुकसान करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी लागणार आहे. - देवांग जानी, गोदाप्रेमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विदर्भात थंडीचा कडाका वाढला! तापमानात ५ अंशांची घसरण, पारा थेट १३ अंशांवर; नागपूरसह अनेक जिल्ह्यांत हुडहुडी

एसटी चालक-वाहकाचा मनमानी कारभार! विद्यार्थिनींना रात्री अंधारात अर्ध्या रस्त्यात उतरविलं, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! ICC कडून २०३५ पर्यंतचं वेळापत्रक जाहीर; भारतात कधी होणार वर्ल्ड कप?

राज्यातील ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर जाणार! मंगळवारपासून कामकाज ठप्प होणार? नेमक्या मागण्या काय?

वंदे भारत ट्रेनचे ब्रेक फेल, तरी ४६३ किमी धावली; रेल्वेच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT