Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti (according to date) Procession from Old Nashik to the beat of drums on Thursday. esakal
नाशिक

Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीनुसार उत्साहात; पारंपरिक ढोलताशांसह मिरवणूक

Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती गुरुवारी (ता. २८) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती गुरुवारी (ता. २८) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी जुने नाशिकमधील महात्मा फुले पुतळ्यापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. पारंपरिक ढोलताशांचा गजर आणि शिवरायांचा जयघोषाने परिसर दणदणून सोडला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांची गुरुवारी (ता. २८) तिथीनुसार जयंती होती. ()

या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला सायंकाळी ५ वाजता महात्मा फुले पुतळ्यापासून प्रारंभ झाला. या मिरवणुकीत रामसिंग बावरी यांच्या हिंदू एकता पक्ष, समस्त भोईराज ट्रस्ट यांचे रथ सहभागी झाले होते. या मिरवणुकीमध्ये नाशिकचा प्रसिद्ध ढोलच्या आवाजाने परिसर दणाणून सोडला. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या मिरवणुकीसाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.  (latest marathi news)

मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू आहे. त्यामुळे चौक मंडई, दूध बाजार परिसरामध्ये गर्दी असते. तसेच सायंकाळी दूध बाजार येथे बाजारही भरलेला असतो. त्यामुळे पोलिसांच्या सूचनेनुसार शिवजयंती मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांच्या प्रमुखांना यापूर्वीच सूचना देण्यात आली होती. त्यानुसार, मुस्लिम बांधवांची सायंकाळची नमाज पठणानंतरच मिरवणूक दूध बाजारातून पुढे मार्गस्थ करण्यात आली.

कडेकोट बंदोबस्त

रमजानमुळे शिवजयंतीची मिरवणूक वाकडी बारव ऐवजी महात्मा फुले पुतळ्यापासून प्रारंभ झाली. यासाठी परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ.सिदधेश्वर धुमाळ, भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते. तसेच, शीघ्रकृती दल, राखीव तुकडी सज्ज होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Online Classes Appeal: ''शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत'', पंतप्रधान मोदींचं आवाहन

PBKS vs DC Live: प्रियांश आर्यचा पहिल्याच चेंडूवर कल्ला... स्टार्कला हाणला Six! नोंदवला भारी विक्रम, अक्षर पटेल स्तब्ध... Video Viral

New Railway Route : रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार! कसारा-मनमाड नव्या रेल्वेमार्गिकेसाठी सर्वेक्षण

रासायनिक भेसळीवर राज्य सरकारचा दणका, दोषी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द होणार

PBKS vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ बदल केले, पण Prithvi Shaw ला नाही खेळवले; पंजाब किंग्सच्या ताफ्यातही बदल

SCROLL FOR NEXT