Chief Minister Eknath Shinde met senior BJP leader Dinkar Patil at his residence  esakal
नाशिक

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे मध्यरात्री दिनकर पाटील यांच्या भेटीला

Nashik News : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून इच्छुक भाजपचे ज्येष्ठ नेते दिनकर पाटील यांची मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवासस्थानी भेट घेतली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून इच्छुक भाजपचे ज्येष्ठ नेते दिनकर पाटील यांची मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या ‘समझोता एक्स्प्रेस’ मुळे पाटील यांनी महायुतीच्या उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा केला. नाशिक लोकसभा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते दिनकर पाटील इच्छुक होते. दीड वर्षांपासून धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी प्रचाराला सुरवात केली होती. (Chief Minister Eknath Shinde)

मात्र, नाशिकची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे गेली व हेमंत गोडसे यांच्या गळ्यात पुन्हा उमेदवारीची माळ पडली. त्यानंतर पाटील यांनी गोडसे यांच्यावर टीका केली व प्रचाराच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिले. पाटील यांची नाराजी कायम असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी (ता.१२) त्यांच्या निवासस्थानी पोचले.

या वेळी लता दिनकर पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे औक्षण केले. त्या वेळी कुठलीच राजकीय चर्चा झाले नसल्याचे सांगण्यात आले असले तरी महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी पाटील यांना केले. भाजप जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस अमोल पाटील, कैलास पाटील, ज्योती कटाळे, यश कटाळे, स्नेहा पाटील, तन्वी पाटील आदी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी संध्याकाळी दिनकर पाटील यांच्या घरी चहापानासाठी मुख्यमंत्री भेटणार होते. परंतु कार्य बाहुल्यामुळे मुख्यमंत्र्यांना जाता आले नाही. या आधीचे नेते सात वाजताच निघून जायचे. मात्र मुख्यमंत्री संवेदनशील असल्याने दिनकर पाटील यांना वाईट वाटू नये रात्री त्यांच्या घरी जाऊन त्यांनी भेट घेतल्याचे सांगितले. (latest marathi news)

दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नांदगावचे आमदार सुहास कांदे यांची भेट घेतली त्यावर बोलताना सामंत यांनी दिंडोरी लोकसभेत मोदींची सभा असल्याने नियोजनासाठी आमदार कांदे यांनी बावनकुळे यांची भेट घेतल्याची सारवासारव केली.

"मुख्यमंत्र्यांनी रात्री उशिरा निवासस्थानी भेट घेतली.भेटीत महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासंदर्भात चर्चा झाली." - दिनकर पाटील, ज्येष्ठ भाजप नेते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT