Poet Sandeep Jagtap esakal
नाशिक

Nashik: चिंचखेडच्या संदीप जगताप यांच्या कविता साता समुद्रापार! शिकागो येथील महाराष्ट्र मंडळाने आयोजित केले ऑनलाईन व्याख्यान

Nashik News : कवी प्रा. संदीप जगताप यांचे "मनातल्या आणि मातीतल्या कविता" या विषयावर भारतीय वेळेनुसार 10 जुलैला सायंकाळी 6. 30 वाजता ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अमेरिकेतील शिकागो येथील मराठी मंडळाच्या वतीने चिंचखेड ता. दिंडोरी, नाशिक येथील प्रसिद्ध कवी प्रा. संदीप जगताप यांचे "मनातल्या आणि मातीतल्या कविता" या विषयावर भारतीय वेळेनुसार 10 जुलैला सायंकाळी 6. 30 वाजता ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे.

हा कार्यक्रम शिकागो व अमेरिकेत राहणारी मराठी माणसे ऑनलाईन बघणार आहेत. नाशिक जिल्ह्याच्या दृष्टीने सातासमुद्रापार संदीप जगताप यांच्या कविता पोहचणार आहे. ही अभिमानाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी दिली आहे. या कार्यक्रमाचे आयोजन शिकागो येथे राहणारे महाराष्ट्र मंडळाचे समन्वयक माधव गोगावले यांनी केले आहे. (Sandeep Jagtap poetry Online lecture by Maharashtra Board in Chicago)

संदीप जगताप यांचा परिचय महाराष्ट्रातला शेतकऱ्यांचा दमदार कवी म्हणून आहेच. तसेच त्यांच्या व्याख्यानाचे कार्यक्रम राज्यभर व राज्याबाहेर देखील लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयात विद्यार्थी गुणगौरव समारंभामध्ये संदीप जगताप यांच्या कविता व त्यांचे भाषण विद्यार्थी डोक्यावर घेतात.

शेतकऱ्यांची वेदना व्यथा मांडणारी कविता व काळजाचा ठाव घेणारी ओघवती निवेदन शैली यामुळे संदीप जगताप अल्पावधीत लोकप्रिय झाले. बेळगाव मध्ये देखील नुकतेच तेथील मराठी माणसांनी त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. (latest marathi news)

एक बाजूला कविता लेखन व दुसऱ्या बाजूला सक्रिय शेतकरी चळवळीतील सहभाग .. आजही शेती करत मातीशी जपलेली नाळ...यामुळे संदीप जगताप यांचे विचार वास्तववादी व तितकेच धारदार बनतात. समाजव्यवस्थेवर त्यांच्या कविता अचूक आसूड ओढतात.. त्यामुळे त्यांच्या व्याख्यानाना महाराष्ट्रामध्ये व महाराष्ट्र बाहेर देखील मागणी आहे.

"शिकागोतील मराठी माणसांनी अतिशय आत्मीयतेने माझे व्याख्यान आयोजित केले याचा मला निश्चितच आनंद झाला. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात मराठी माणूस राहत असेल तर त्याच्याशी बोललं पाहिजे या विचारातून मी या कार्यक्रमाला होकार दिला. शेतकरी चळवळीत काम करताना लेखनाकडे दुर्लक्ष झाले आहे. परंतु मी कवितेची नाळ तुटू दिली नाही. म्हणून निवडक कार्यक्रमाला जात असतो. आज ही लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो व ती प्रेरणा मला लिहतं व बोलतं ठेवते." - कवी संदीप जगताप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Day 4: भारताचा श्रीलंकेवर कहर! 290 धावांत ऑलआऊट करत दिला फॉलोऑन; दिनुशाचं शतकही व्यर्थ

Palghar Attack Case: कोयत्याने वार केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू ; दोन महिन्याच्या उपचारानंतरही झुंज अपयशी

भावांची एक लाईन आणि ओवाळणाऱ्या बहिणींची दुसरी लाईन... झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या रक्षाबंधनाच्या आठवणी

Latest Marathi News Live Update : मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब

CTET 2026 New Date : सीटीईटी परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलली; नवी तारीख 'या' दिवशी होणार जाहीर

SCROLL FOR NEXT