accidental vehicles esakal
नाशिक

Nashik Accident News : मुंबई आग्रा महामार्गावर उड्डाणपुलावर चार वाहनांचा सिनेस्टाईल अपघात

Accident News : सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसून किरकोळ जखमी झाल्याची माहिती समजत आहे. मात्र चारही वाहनांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे.

योगेश मोरे

पंचवटी : पावसाळा सुरू झाला म्हणजे खड्डे पडणार हे नाशिककरांना नवीन नाही. मुंबई आग्रा महामार्गावर उड्डाण पुलावर चार चारचाकी वाहनांचा असाच सिनेस्टाईल अपघात झाला. यात एकमेकांवर गाड्या चढल्याचे दिसून येत आहे. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसून किरकोळ जखमी झाल्याची माहिती समजत आहे. मात्र चारही वाहनांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे. (Nashik cinestyle accident involving four vehicles on flyover marathi news)

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या दोन दिवसापासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. या पावसाने मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाचे पडलेल्या खड्ड्यांमुळे कामाचे पितळ उघडे पडले आहे. टोल वसुली करून देखील रस्ता हा खड्डेमय झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवार ता.२३ रोजी शिवसेना उबाठा-गटाने घोटी येथील टोलनाक्यावर जाऊन आंदोलन देखील केले होते.

बुधवार ता.२४ रोजी दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास आडगाव कडून मुंबईकडे जाणाऱ्या चार चारचाकी वाहनांचा सिनेस्टाईल अपघात झाला. यात टाटा सफारी गाडीवर फॉर्च्युनर , फॉर्च्युनर गाडीवर स्विफ्ट, स्विफ्टवर महिंद्रा हल्क ही गाडी चढलेली दिसून येत आहे. (latest Marathi news)

सदर अपघात हा खड्ड्यामुळे झाला असल्याचे निदर्शनास येत आहे. तरी देखील महामार्ग प्रशासनाने या खड्ड्यांचा प्रश्न वेळीच मार्गी लावा अशी मागणी नागरिकांकडून केले जात आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही. मात्र चारही वाहनांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : कोयना धरण निम्म्याहून अधिक भरलं! पण 100 टक्के भरण्यासाठी अजून किती टीएमसी पाण्याची गरज? पाहा लेटेस्ट अपडेट

IND vs ENG Weather Update: भारत-इंग्लंड शेवटच्या टी२० सामन्यात पावसाचा धुमाकूळ की होणार पूर्ण खेळ? हवामान खात्याने दिला 'हा' इशारा...

Latest Marathi News Live Update : येरवडा गणेश नगर परिसरात दोन गटांतील मुलींमध्ये जोरदार हाणामारी

Hingoli: माळसेलूत चिखल तुडवत विद्यार्थी शाळेत ; रस्त्याची दुरवस्था; पालकांत तीव्र संताप; आरोग्याचा प्रश्नही गंभीर, ग्रामपंचायतीचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Maharashtra ATS Raids : पाकिस्तानी गुंडांशी सोशल मीडिया कनेक्शन! कोल्हापूरच्या 2 तरुणांची 10 तास कसून चौकशी; 'एटीएस'कडून राज्यभरात 112 तरुणांची झाडाझडती

SCROLL FOR NEXT