Tea  esakal
नाशिक

Tea Lover : उन्हाच्या चटक्यातही चायप्रेमींचे प्रेम अबाधित; गुळाचा चहा पिणाऱ्यांची संख्या वाढली

Nashik News : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ताक, लिंबू सरबत, लस्सी या पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन केले जाते. मात्र एवढ्या उन्हाळ्यातही नाशिककरांचे चहावरील प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही.

सकाळ वृत्तसेवा

निखिल रोकडे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सर्वसाधारणपणे उन्हाळ्यामुळे तापमान वाढले की आपण थंड पेय पिण्यासाठी प्राधान्य देतो. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ताक, लिंबू सरबत, लस्सी या पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन केले जाते. मात्र एवढ्या उन्हाळ्यातही नाशिककरांचे चहावरील प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. (citizens love for tea not diminished even in summer)

कारण उन्हाचे चटके बसत असताना सुद्धा चायप्रेमींची संख्या नाशिकमध्ये वाढतच आहे. त्यामध्ये विशेष करून चहाच्या वेगवेगळ्या प्रकारांना मागणी अधिक प्रमाणात आहे. अलीकडच्या काळात गुळाचा चहा पिणाऱ्यांची संख्या ही वाढली आहे. जहर को जहर मारता है, और लोहे को लोहा काटता है! या फिल्मी डायलॉगप्रमाणे खरे ठरत असल्याचे चित्र चहा पिणाऱ्यांच्या वाढणाऱ्या प्रमाणावरून लक्षात येत आहे.

काही वर्षांपूर्वी चहा म्हटलं, की एकच प्रकारचा चहा आपल्याला माहीत होता. मात्र आता चहाचे इतके प्रकार आले आहे की वेगवेगळ्या चवीतही हवा तसा चहा उपलब्ध आहे. ब्लॅक टी, अद्रक, लेमन, गुळाचा, ग्रीन टी, मुंबई कडक, कावा अशा अनेक फ्लेव्हरमध्ये चायप्रेमींसाठी उपलब्ध आहे. काही कालावधी पूर्वी टपरी हे एकमेव चहा मिळण्याचे ठिकाण होते. फार तर फार हॉटेलमध्ये चहा मिळत असे.

मात्र आता चहाचे वेगवेगळे प्रकार बघून आकर्षक दुकानं इंटेरियर केलेले लाखो करोडो रुपये खर्च करून फक्त चहा उपलब्ध असणारे अनेक आउटलेट बघायला मिळत आहे. यात प्रामुख्याने अमृततुल्य ही कन्सेप्ट सध्या जास्त प्रमाणात दिसत आहे. पुणे, मुंबई शहरानंतर नाशिकमध्येही ‘अमृततुल्य’चे फॅड ही इतके वाढले की छोटेखानी शोरूम सारखे चहाचे हजाराच्या संख्येने हे स्टॉल्सही वाढले आहेत. (latest marathi news)

भीषण उन्हातून फिरत असताना अचानक लाल कपडा बर्फाला गुंडाळलेला लिंबू पाणीवाला दिसला की आपण घटाघट लिंबू पाणी घशात ओतून घेतो व मनाला तृप्ती मिळते. मात्र लिंबू पाणी सरबत पिताना व चार मित्र मिळून टपरीवर चहा पितानाचा जो आनंद आहे , यामध्ये मात्र फरक आहे. यात चहा पिणाऱ्यांचा जास्त आनंद अनुभवला जातो, असे बघावयास मिळाले आहे. त्यामुळे अशा भीषण उन्हाळ्यातही तो चहाने आपली उष्णता भागत असल्याचे दिसून येतो.

"चहा विक्रीत कसलीही घट झालेली नाही. याउलट महाविद्यालयीन युवक- युवती चहा पिण्यासाठी अधिक प्राधान्य देतात. मात्र गुळाचा चहा पिण्यासाठी अधिक मागणी आहे. कारण साखरेच्या चहापेक्षा गुळाचा चहा अधिक नैसर्गिकरित्या असल्याचा जाणवतो." - अभिषेक कुमावत, शिवराय अमृततुल्य

"चहाचे प्रमाण सेवनामध्ये अधिक असल्यास शुगर फ्री चहा पिलेला कधीही हितकारक होय. गूळ व साखरेच्या चहामध्ये ग्लुकोज असते, त्यामुळे डायबिटीज रुग्णांनी हे टाळावे. गुळामध्ये आयर्न म्हणजेच लोह असल्यामुळे शरीरासाठी उपयुक्त आहे. मात्र त्याचे सेवन मात्र प्रमाणात असावे." - डॉ. चेतन पाटील, मुक्ताई हॉस्पिटल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT