nashik city bus service expansion break MNGL sakal
नाशिक

नाशिक सिटी बस विस्ताराला ‘एमएनजीएल’चा खोडा

१०२ बस डेपोत पडून; शहर बससेवेच्या विस्ताराला ‘ब्रेक’

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सार्वजनिक वाहतुकीला बळकटी मिळावी व पर्यावरणपूरक शहराची प्रतिमा कायम राहावी, या उद्देशाने महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीकडून सुरू करण्यात आलेल्या शहर बससेवेला प्रतिसाद मिळत असताना सीएनजी गॅस उपलब्ध होत नसल्याने शहर बससेवेचा विस्ताराला ब्रेक लागला आहे.

महापालिकेकडून गेल्या वर्षी जुलै महिन्यात शहर बससेवेला सुरवात झाली. पहिल्या टप्प्यामध्ये ५१ बस रस्त्यावर उतरविण्यात आल्या. बससेवेला चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष करून ग्रामीण भागांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाल्याने बससेवेबाबतचा महापालिकेचा आत्मविश्‍वास दुणावला. आत्तापर्यंत ५१ हजार दररोजचे प्रवासी सिटी बसमधून प्रवास करत आहे. दैनंदिन उत्पन्नदेखील सोळा लाखांच्या वर पोचले आहे. बससेवेला वाढता प्रतिसाद मिळत असल्याने सिटीलींक कंपनीने बससेवेचा विस्तार करण्याचे नियोजन केले आहे. सध्या १४८ बस सीएनजीवर चालतात. अजून महापालिकेला शहरामध्ये १०२ सीएनजी बस रस्त्यावर उतारवयाच्या आहे. परंतु, महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून प्रकल्पाला गती मिळत नसल्याने सीएनजीचा तुटवडा भासत आहे. सीएनजी उपलब्ध होत नसल्याने महापालिकेचा बस विस्तार रखडला आहे.

'सीएनजी’चा अपुरा पुरवठा

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड व महापालिकेमध्ये संयुक्त करार झाला आहे. त्यानुसार एक रुपया कमी दराने महापालिकेच्या सिटी बससाठी सीएनजी गॅस पुरवला जातो. सध्या सीएनजी गॅस सिलिंडर स्वरूपात उपलब्ध होत आहे. त्यावर ९८ सिटी बस धावतात. अजून पन्नास सीएनजी बस महापालिकेला रस्त्यावर आणायच्या आहे. परंतु, सीएनजी पुरवठा होत नसल्याने अडचणी निर्माण होत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meghalaya Minister Resignations: मेघालयमध्ये राजकीय हालचालींना वेग; 12 पैकी आठ मंत्र्यांचे राजीनामे; जाणून घ्या, नेमकं कारण?

मोदी सरकार हिंदू-मुस्लिम कार्ड खेळतंय... राहुल गांधी सकारात्मक विचाराचे! Shahid Afridi च्या विधानाचा BJP कडून समाचार

Latest Marathi News Updates : आयुष कोमकर हत्या प्रकरण : कृष्णा आंदेकर २ दिवस पोलीस कोठडीत

Bigg Boss 19 : बिग बॉस 19 मध्ये दोन स्पर्धकांनी घातला राडा; कायमचे झाले नॉमिनेट, काय घडलं नेमकं जाणून घ्या

Hingoli News : चार वर्षानंतरच्या मुहूर्ताला पालकमंत्र्यांचा खोडा; शिक्षक पुरस्काराचे वितरण पुढे ढकलले

SCROLL FOR NEXT