Nashik City Bus esakal
नाशिक

नाशिक शहर बससेवेत दरवाढ... | CITILINK

विक्रांत मते

नाशिक : महापालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या शहर बससेवेतील तोटा लक्षात घेता सिटीलिंक (CITILINK) कंपनीने पाच टक्के प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला सादर केला आहे. प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर भाडेवाढ लागू होईल. सहा महिन्यातच भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

महापालिकेतर्फे ८ जुलै पासून शहर बससेवा सुरू करण्यात आली. महापालिकेने थेट बससेवा सुरू करण्याऐवजी ऑपरेटर्स नियुक्त करण्यात आले. चालक व वाहकांचे आऊटसोर्सिंग करण्यात आले. नाशिक महानगर परिवहन समिती कंपनीची स्थापना करण्यात आली. सध्या ४२ मार्गांवर १४८ बस चालविल्या जात आहेत. एका बसमधून प्रतिकिलोमीटरला ४५ रुपये उत्पन्न मिळते. वास्तविक महापालिकेने ७२ रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. साधारण २६ रुपये किलोमीटरला तोटा येतो. ८ जुलै २०२१ ते ३१ मार्च २०२२ दरम्यान २७ कोटी रुपयांचा तोटा होण्याची शक्यता आहे. तोटा कमी करण्यासाठी फायद्याच्या मार्गावर बस वाढविण्याबरोबरच जाहिरातीच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पुढील टप्प्यात सिटीलिंक कंपनीने ५ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिल्यास दोन ते तीन रुपये वाढ होणार आहे.

''सिटीलिंक कंपनीने दरवर्षी पाच टक्के भाडेवाढीचे धोरण स्वीकारले आहे. गेल्या काही महिन्यांत इंधनाचे दर सातत्याने वाढत असल्याने प्रवासी भाडेदरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतरच अंमलबजावणी होईल.'' - कैलास जाधव, आयुक्त

प्रस्तावित प्रवासी दरवाढ (रुपयांत)

किलोमिटर सध्याचे दर प्रस्तावित दर
प्रौढ बालक प्रौढ बालक
०-२ १० ५ १० ५
२-४ १५ १० १६ १०
४-६ २० १० २१ ११
६-८ २५ १५ २७ १५
१०-१८ ३० १५ ३२ १६
१८-२२ ३५ २० ३७ २१
२२-२६ ४० २० ४२ २१
२६-३० ४५ २५ ४८ २५
३०-३८ ५० २५ ५३ २७
३८-४२ ५५ ३० ५८ ३०
४२-४६ ६० ३० ६३ ३२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमध्ये लाचखोरीप्रकरणी कृषी अधिकाऱ्यासह तिघांना अटक

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT