The dried up river bed of the mill that supplies water to Kalwan city.
The dried up river bed of the mill that supplies water to Kalwan city. esakal
नाशिक

Nashik News : कळवणच्या नगराध्यक्षांनी जपला माणुसकीधर्म! शेतीपिकांऐवजी शहराला पाणीपुरवठा; दुष्काळात दिलासा

रवींद्र पगार

कळवण : जिल्ह्यात सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असताना लोकप्रतिनिधींकडून शासनाकडे पाण्याची मागणी केली जात असल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी दिसत असले तरी कळवण शहर मात्र त्याला अपवाद ठरले आहे. लोकप्रतिनिधींनी म्हणजेच नगराध्यक्ष कौतिक पगार यांनी स्वतःच्या विहिरीतून शेतीपिकांना दिले जाणारे पाणी बंद करून शहरवासियांना मुबलक पाणी उपलब्ध करून देत माणुसकीधर्म निभावला आहे. त्यांच्या या भूमिकेचे कौतुक होत आहे. (Nashik city chief kalavan water supply to city marathi news)

कळवण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नगरपंचायतीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या गिरणा व बेहडी नदीपात्रातील विहिरींनी तळ गाठल्याने कळवण शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. काही दिवसांपासून एक दिवसांआड शहराला पाणीपुरवठा सुरु आहे.

नगरपंचायत प्रशासनाने आढावा घेऊन संभाव्य पाणीटंचाईबाबत उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली असली तरी आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार अशी परिस्थिती आहे. गिरणा नदीपात्र कोरडेठाक पडल्याने पाणीटंचाई जाणवत आहे.

आज शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन ओतूर रोड येथील पाण्याची टाकी व वाणी मंगल सार्वजनिक वाचनालयाशेजारील पाण्याच्या टाकीत नगराध्यक्ष कौतिक पगार यांच्या विहिरीच्या पाण्याने भरण्यात आल्या आहेत. दोन्ही टाक्यांतून मुबलक पाणीपुरवठा होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. (latest marathi news)

सलग १६ तास पाणीपुरवठा

कळवण शहराला सध्या मुबलक पाणी उपलब्ध होत असले तरी शहरातील नागरिकांनी मात्र पाणी जपून वापरण्याची गरज असून, भविष्यात पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. कौतिक पगार यांनी स्वमालकीच्या विहिरीतून २० हॉर्स पॉवरच्या मोटारीतून ६ इंच पाईपद्वारे नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेमध्ये सलग १६ तास पाणीपुरवठा होत असल्यामुळे कळवणचा पाणीप्रश्‍न मिटला आहे.

"कळवण शहरातील मूलभूत प्रश्‍न सोडविण्यासाठी नागरिकांनी टाकलेली जबाबदारी आणि विश्‍वास सार्थ ठरवण्यासाठी कटिबद्ध आहे. उन्हाळ्यात नदीपात्रातील विहिरींनी तळ गाठल्याने नागरिकांना पाण्याची कमतरता जाणवू नये, यासाठी स्वमालकीच्या विहिरीतून नगरपंचायतीला पाणी देत मुबलक पाणी उपलब्ध करून दिले आहे."

- कौतिक पगार, नगराध्यक्ष, कळवण

"नगराध्यक्ष कौतिक पगार यांच्यासह शेतकरी खंडू निकम व छगन सोनवणे यांनी काही भागात आपल्या विहिरीद्वारे पाणी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे शहरात पाणीप्रश्‍नाची सोडवणूक करून आदर्श निर्माण केला आहे."- जोत्स्ना जाधव, पाणीपुरवठा सभापती, कळवण

"कळवण शहराची लोकसंख्या २५ हजाराच्या आसपास आहे. शहरात तीन जलकुंभ असून, प्रत्येक जलकुंभाची क्षमता अडिच लाख लिटर आहे. ३ हजार ९०० नळ कनेक्शन असून, ९ बोअरवेल आहेत. शहरात दहा लाख लिटर दररोज पाणीपुरवठा होतो. नागरिकांनी पाणी जपून वापरावे."- नागेश येवले, मुख्याधिकारी, कळवण

"कळवण शहरात ज्याज्या वेळी पाणीटंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी नेहमीच कौतिक पगार यांनी पाणी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे पाण्यासाठी महिलांची होणारी पायपीट थांबली आहे."- रोहिणी पगार, गृहिणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT