giripushp.jpg 
नाशिक

World Environment Day : नाशिकमध्ये खुलली विविधरंगी वृक्षसंपदा...मात्र 'या' वृक्षांचा वाटा सर्वाधिक!

विक्रांत मते

नाशिक : राज्यात सर्वप्रथम वृक्षांची गणना करणाऱ्या महापालिका हद्दीत तब्बल 47 लाख 95 हजार अधिक वृक्षे आढळली आहेत. वृक्षसंपदेत सर्वाधिक वाटा गिरिपुष्प वृक्षांचा असून, त्याचे प्रमाण तब्बल 45 टक्के आहे. शहरात एवढी गिरिपुष्प जातीची झाडे आहेत. तर इतकी सुबाभूळ दुसऱ्या क्रमांकावर आढळल्या आहेत. त्याखालोखाल निलगिरी, अशोका व गुलमोहरचे प्रमाण अधिक असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. 

38 लाखांपेक्षा अधिक वृक्षसंपदा

"स्वच्छ नाशिक, हरित नाशिक'चा नारा देत असताना शहरात खरोखर वृक्षसंपदा आहे की नाही, हे तपासण्यासाठी महापालिकेने वृक्ष सर्वेक्षणाचा निर्णय घेतला. त्यासाठी मुंबईच्या टेरॅकॉन कंपनीची नियुक्ती करण्यात आली. दोन वर्षांत झालेल्या सर्वेक्षणात 38 लाखांपेक्षा अधिक वृक्षसंपदा आहे. शहरात गिरिपुष्पाचे प्रमाण सर्वाधिक आढळले एकूण 21 लाख 24 हजार 113 गिरिपुष्प असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. चार लाख 19 हजार 804 सुबाभूळ, आंब्याची 95 हजार 820, बोर 59 हजार 333, बटरफ्लाय पाल्म 32 हजार 369, चंदनाची 19 हजार 717 झाडे आढळली. बेंजामिना हा वडाच्या जातीचा प्रकार असून, त्याची संख्या दोन हजार 949 आहे.

नारळाची 14 हजार 388 झाडे

मध्यंतरीच्या काळात झरकन वाढणाऱ्या गुलमोहर प्रजातीची झाडे लावण्याकडे कल वाढल्याने आतापर्यंत 18 हजार 872 गुलमोहराची झाडे लावली गेली. कडुनिंबाची 35 हजार 635, करंजी 23 हजार 608, तर कांचन जातीची 19 हजार 309 झाडे आहेत. नारळाची 14 हजार 388, निलगिरीची 35 हजार 369 झाडे आहेत. सिल्व्हर ओक 32 हजार, सिसम दहा हजार 825, विलायची चिंचेची वीस हजार 578 झाडे आढळली आहेत.

शहरात 19 हजारांपेक्षा अधिक चंदनाची झाडे

चंदनाची झाडे सुवासिक व फर्निचरसाठी उपयोगी असल्याने या झाडांना मोठी किंमत असते. शहरात 19 हजारांपेक्षा अधिक झाडे आहेत. शहरातील सरकारी व निमसरकारी जागांवर सर्वाधिक झाडे आहेत. सरकारी जागांवर 24 लाख 67 हजार 296, त्याखालोखाल खासगी जागांवर 11 लाख 59 हजार 292 झाडे आहेत. औद्योगिक वसाहतीत सहा हजार 551, उद्यानांमध्ये 16 हजार 117 झाडे आहेत. रस्त्याच्या कडेला 50 हजार 744 झाडे सर्वेक्षणात आढळली आहेत. 

वड हद्दपारीच्या मार्गावर 

धार्मिक महत्त्व असलेला वड शहरातून नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते. सध्या शहरात फक्त एक हजार 660 वड, तर तीन हजार 192 पिंपळ आहेत. उंबराची तीन हजार 658 झाडे आहेत. 

वृक्षगणनेत महत्त्वाचे
 
- शोभिवंत झाडे ----- 30 लाख एक हजार 497 

- फळझाडे ----- दोन लाख 53 हजार 879 

- औषधी वनस्पती ----- चार लाख 82 हजार 469 

- ओळखता न आलेली झाडे ----- चार हजार 313 

दुर्मिळ वनस्पती 

शमी, रोज ऍपल, कुमकुम, हिरडा, जायफळ, तेडू, रुद्राक्ष, समुद्रफळ, तेवर, रानचिक्कू, दालचिनी, अळू, ऍव्होकॅडा, गुलाबजाब, लिची, माकडलिंबू, निरफणस, गेला, पाचारी, रतनगुंज, महुआ, खिर्णी, काकड, काळा उंबर, धामण, धात्रीफळ, आफ्रिकन ऑइल पाल्म सर्वेक्षणात आढळल्या. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT