nashik city bus service Sakal
नाशिक

नाशिक सिटी बससेवा सुसाट; हजारो प्रवाशांचा उस्फूर्त प्रतिसाद

विक्रांत मते

नाशिक : महापालिकेच्या सिटीलिंक बससेवेला प्रवाशांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सध्या सुरू असलेल्या ५२ बसमधून जुलैअखेर तब्बल दीड लाखांच्या वर प्रवाशांनी प्रवास केला. ऑगस्टच्या प्रारंभी कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर प्रवासी संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी एकाच दिवशी १४ हजार प्रवाशांनी प्रवास केला. अडीचशे बस सुरू झाल्यानंतर दररोज सरासरी एक लाख प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे.

महापालिकेकडून आठ जुलैपासून शहर बससेवा सुरू झाली. पहिल्या टप्प्यात तपोवन ते बारदान फाटा, तपोवन ते सिम्बायोसिस कॉलेज, तपोवन ते पाथर्डी गाव, सिम्बायोसिस कॉलेज ते बोरगड, तपोवन ते भगूर, नाशिक रोड ते बारदान फाटा, नाशिक रोड ते अंबड गाव, नाशिक रोड ते निमाणी, नाशिक रोड ते तपोवन या नऊ मार्गांवर मार्गांवर २७ बस सुरू करण्यात आल्या. त्यानंतर नाशिक रोड ते सिम्बॉयसिस कॉलेज, तपोवन ते अंबड, तपोवन ते पाथर्डी, तपोवन ते अंबड (कामटवाडे मार्ग) या नवीन चार मार्गांची भर पडली. मार्गिका वाढल्याने २३ बस रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी तीन हजार प्रवासी मिळाले. त्यातून एक लाख ६५ हजार रुपये उत्पन्न मिळाले. बससेवेला दिवसागणिक प्रतिसाद मिळत आहे. प्रवासी संख्या वाढत असल्याने बसची संख्या वाढविली जात आहे. शहरात सध्या ५२ बस सुरू आहेत. सिटीलिंक कंपनीकडून पंधरा दिवसांच्या बससेवेचा आढावा घेतल्यानंतर त्यात एक लाख प्रवासी टप्पा ओलांडल्याचे स्पष्ट झाले. जुलैअखेरपर्यंत दीड लाख प्रवाशांनी शहर बससेवेचा लाभ घेत प्रवास केला.

ग्रामीण भागात बससेवा

शहरातील प्रवाशांना बससेवेचा लाभ देताना कमीत-कमी तोटा व्हावा, या उद्देशाने ग्रामीण भागातील वर्दळीच्या मार्गावर बससेवा सुरू केली जाणार आहे. त्या अनुषंगाने नाशिक रोड डेपोतून नांदूर- मानूर, जत्रा हॉटेलमार्गे कसबे- सुकेणे, तसेच गिरणारेपर्यंत शहर बससेवा पोचविली जाणार आहे. बुधवारी (ता.४) ५२ बसमधून चौदा हजार ९८ प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून दोन लाख ९१ हजार रुपये उत्पन्न प्राप्त झाले. तपोवन डेपोतून सुमारे दीड लाख, तर नाशिक रोड डेपोतून एक लाख चाळीस हजार रुपये उत्पन्न सिटीलिंक कंपनीला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT