Citylinc Employees Strike esakal
नाशिक

Nashik Citylinc Strike: वेतन थकल्याने वाहकांचा पुन्हा संप; उद्यापासून बस धावणार!

उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत तोडगा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Citylinc Strike : सिटीलिंक कंपनीच्या वाहकांनी ठेकेदाराकडून वेतन प्राप्त न झाल्याने शुक्रवारी (ता. ४) पुन्हा संप पुकारला.

ठेकेदार, संघटनाप्रमुख तसेच सिटीलिंक कंपनीच्या अधिकाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत तोडगा काढण्यात आला.

त्यामुळे शनिवारी (ता. ५) सकाळपासून बससेवा सुरू होईल, अशी माहिती सिटीलिंक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी दिली. (Nashik Citylinc Strike Carriers Strike Again Over Wages bus will run from tomorrow)

महापालिकेकडून मागील वर्षी शहर बससेवा सुरू करण्यात आली. ग्रॉस क्रॉस कटिंग या तत्त्वावर सुरू झालेल्या बससेवेला ठेकेदारांसह सिटीलिंक कंपनीच्या कार्यालयात बसलेल्या मनमानी कारभाराचा फटका बसत आहे.

बससेवा सुरू झाल्यापासून हा पाचवा संप आहे. संपात दिवसभर बससेवा बंद राहतं असल्याने प्रवासी खासगी सेवेकडे वळत आहे. मागील महिन्यात दोन महिन्यांचे वेतन थकविल्याने वाहकांनी संप पुकारला.

दोन दिवस संप चालला. विधानसभेतदेखील या प्रश्नावर चर्चा झाली. पालकमंत्री दादा भुसे यांनी वाहक पुरवठादार ठेकेदार व सिटीलिंकच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली.

२१ जुलैपर्यंत मे व जून या दोन महिन्यांचे थकीत वेतन अदा करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने वाहकांनी डबल बेल दिली. परंतु ३१ जुलैपर्यंत मे महिन्याचेच वेतन अदा करण्यात आल्याने शुक्रवारी पहाटेपासून आंदोलनाला सुरवात झाली.

सिटीलिंक कंपनीच्या सर्वच वाहक संपावर गेल्याने २४० बस डेपोमध्ये उभ्या होत्या. संपामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा वापर करावा लागला. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या संयुक्त बैठकीतील निर्णयानुसार ९ ऑगस्टपर्यंत वेतन देण्याचे आश्वासन देण्यात आले.

त्यामुळे शनिवारपासून आंदोलन मागे घेऊन सुरळीत बस रस्त्यावर धावतील, अशी माहिती कंपनीचे सीईओ चौधरी यांनी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आर्थिक फटका

थकीत वेतनासाठी वाहकांनी १ सप्टेंबर २०२२ ला संप पुकारला होता. त्यानंतर दोन डिसेंबर २०२२, १३ एप्रिल २०२३, १८ व १९ जुलै २०२३ या प्रमाणे संप पुकारण्यात आला.

४ ऑगस्टला पुकारलेला पाचवा संप होता. सातत्याने संप पुकारला जात असल्याने प्रवाशांना सार्वजनिक वाहतूक सेवेची लागलेली सवय तुटत असून त्याचा आर्थिक फटका सिटीलिंक सेवेला बसत आहे.

बससेवा संपाचा परिणाम

- २० लाखांच्या महसुलावर पाणी.
- बसच्या तब्बल दोन हजार फेऱ्या रद्द.
- प्रशासनाकडून ठेकेदाराला दंडाची नोटीस.
- दोन वर्षात पाच वेळा संप

बावीस मुद्द्यांवर आंदोलन

दोन महिन्यांपासून थकलेले वेतन यासह २२ मुद्द्यांवर कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यावर कर्मचारी ठाम आहेत. गेल्या दोन वर्षांपासून वेतनवाढ झालेली नाही.

दर सहा महिन्यांनी वेतनात इन्क्रिमेंट होत असते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून ही इन्क्रिमेंट वाढ झालेली नाही. दोन वर्षे कोणत्याही प्रकारचा बोनस देण्यात आलेला नाही.

यासह कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह खात्यात निधीदेखील भरलेला नाही. सिटीलिंक प्रशासन संगनमताने कर्मचारी वर्गाची दिशाभूल करीत आहेत, असेदेखील आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ''आरोपींच्या विरोधात शब्दही न बोलणारे लोकप्रतिनिधी...'', धनंजय देशमुखांचा मुंडेंवर घणाघात

माधुरीचं 'हे' गाणं अश्लिल म्हणत कोर्टाने केलेलं बॅन, दूरदर्शन, रेडिओवर सुद्धा गाणं वाजवण्यास होती बंदी

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगर लाठीचार्ज प्रकरण 30 अटकेत असलेल्या सर्व आरोपीना मिळाला जामीन

Kojagiri Pournima : किल्ले रायगड आजही विसरू शकणार नाही कोजागिरीशी जोडला गेलेला शिवाजी महाराजांचा इतिहास, हिरा बनली हिरकणी...

Natural Cough Relief for Children: धोकादायक कफ सिरप नकोच..! लहान मुलांना खोकला झाल्यावर 'हा' रामबाण उपाय करा

SCROLL FOR NEXT