NCP Youth Congress City President Ambadas Khaire and office bearers while giving a statement of demands to Citylink managers. esakal
नाशिक

Nashik Citylinc Bus : बेशिस्त बसचालकांना शिस्त लावावी; सिटीलिंक व्यवस्थापकांकडे मागणी

Citylinc Bus : बसचालक बेशिस्तीने बस चालवत असून, त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Citylinc Bus : सिटीलिंक बससेवेतील चालक व वाहक नागरिकांशी असभ्य वागत असल्याने तसेच वाहतुकीचे नियम न पाळता बेशिस्तीने बस चालवत असल्याने चालक, वाहकांना शिस्त लावावी, असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी नाशिक महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकांना दिले. शहरात सिटीलिंकच्या माध्यमातून नाशिककरांसाठी बससेवा सुरू करण्यात आली आहे. (Nashik citylinc Unruly bus drivers marathi news)

परंतु बसचालक बेशिस्तीने बस चालवत असून, त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. बस चालवताना शिस्त न पाळता एकाच वेळी शेजारी, शेजारी बस चालविणे, रस्त्यात बस थांबवून इतर वाहनचालकांना रस्ता न देणे, बसथांब्यावर व्यवस्थित बस न थांबविणे, थांब्यापासून दूर थांबवणे, वेगाने गाडी चालवून इतर वाहनांना ओव्हर टेक करणे, रस्त्यावरील इतर वाहनांना कट मारणे, असे सर्रास प्रकार चालक करत आहेत.

त्यांच्या बेशिस्तपणामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहेत. तसेच वाहक प्रवाशांसोबत अरेरावी करत असून सुट्टे पैशासाठी वाद घालणे, महिला वर्गासोबत असभ्य वागणे, गर्दीच्या वेळी अरेरावी करणे असे प्रकार प्रत्येक बसमध्ये घडत आहे. चालक व वाहक यांना शिस्तीचे धडे देऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.

या वेळी अमोल नाईक, मुकेश शेवाळे, डॉ. संदीप चव्हाण, विशाल डोखे, संदीप गांगुर्डे, दीपक पाटील, रामदास मेदगे, संदीप खैरे, राहुल पाठक, अक्षय पाटील, रवींद्र शिंदे, सागर मोरे, सौरभ राठोड, मंगेश दरोडे, किशोर पवार आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Taxi: मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार? मोठी अपडेट आली समोर, वाचा सविस्तर...

INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Kolhapur : आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावानेच केलेलं कांड; मैत्री करत...

माेठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शनमोडवर; आमदार संग्राम जगताप यांना नोटीस देणार; नेमकं काय प्रकरण?

Barshi fraud:'रामगिरी शुगर्स कारखान्याची जमीन गहाण'; २ कोटी १० लाखाची फसवणूक, बार्शी पोलिसांत दोन महिलांसह सात जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT