Citylink Bus esakal
नाशिक

Nashik Citylink Bus : सिटीलिंकच्या 35 बस पुन्हा रस्त्यावर! शाळा उघडणार असल्याने 115 फेऱ्या वाढविणार

Nashik News : १५ जूनपासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे सिटीलिंक कंपनीने बंद केलेल्या ११५ बस फेऱ्या वाढविण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : १५ जूनपासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे सिटीलिंक कंपनीने बंद केलेल्या ११५ बस फेऱ्या वाढविण्यात येणार आहे. १८ जूनपासून उन्हाळी सुट्यांमुळे बंद केलेल्या ३५ बसची सेवादेखील सुरू केली जाणार असल्याची माहिती सिटीलिंक महाव्यवस्थापक मिलिंद बंड यांनी दिली. महापालिकेकडून जुलै २०२१ पासून शहर बससेवा सुरू करण्यात आली आहे. (Citylink bus 115 trips will be increased as school will be opened)

६३ मार्गावर सध्या २४५ बस सुरू करण्यात आल्या आहेत. कामगार वर्ग व विद्यार्थ्यांसाठी बससेवा उपयुक्त ठरत आहे. मात्र शाळा व महाविद्यालयांना उन्हाळ्यात सुट्टी लागल्यामुळे प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यामुळे सिटीलिंक कंपनीने ३५ बसची सेवा २५ एप्रिलपासून बंद केली होती.

त्याचबरोबर ११५ बस फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आली. १५ जूनपासून शाळा सुरू होत असल्याने १८ जूनपासून बंद केलेल्या ३५ बस पुन्हा सुरू केल्या जाणार आहेत. (latest marathi news)

त्याचप्रमाणे सिटीलिंक प्रवासी पाससाठी निमानी बसस्थानक व सिटीलिंकच्या त्र्यंबक रोडवरील कार्यालयात एक केंद्र सुरू करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी केटीएचएम महाविद्यालयात प्रत्येकी दोन तसेच शिवाजीनगर येथे एक पास केंद्र सुरू केले जाणार असल्याचे माहिती बंड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT