Citilink bus drivers' strike continues dangerous journey with extra passengers in rickshaws esakal
नाशिक

Nashik News : सिटीलिकंच्या संपामुळे रिक्षाचालकांची चंगळ; अतिरिक्त भाडे घेत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक

Nashik : सिटीलिंक बसचालकांनी मागण्यांसाठी शनिवारी (ता. २७) संप पुकारला आहे. यामुळे शहराची सार्वजनिक वाहतूक सेवा कोलमडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सिटीलिंक बसचालकांनी मागण्यांसाठी शनिवारी (ता. २७) संप पुकारला आहे. यामुळे शहराची सार्वजनिक वाहतूक सेवा कोलमडली आहे. बससेवा बंद झाल्याने हा संप रिक्षाचालकांच्या पथ्यावर पडला आहे. त्यांच्याकडून याचा पुरेपूर फायदा घेत अतिरिक्त प्रवासी भाडे आकारत खिशा भरण्याचे काम सुरू आहे. शनिवारपासून सिटी लिंक बसचालकांकडून विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला होता. (Citylink strike rickshaw pullers are charging extra fare and transporting passengers beyond capacity )

रविवारी दुसऱ्या दिवशीही त्यामुळे बससेवा ठप्प झाली होती. प्रवाशांना प्रवास करण्यासाठी रिक्षा व्यतिरिक्त दुसरे कुठलेही साधन राहिली नाही. त्यात रविवारची सुटी असल्याने बहुतांशी नागरिक शहरातील मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी आले होते. तर काही नागरिक विविध कामानिमित्ताने शहरात दाखल झाले होते. त्यांना ये-जा करण्यासाठी रिक्षाने प्रवास करण्या व्यतिरिक्त पर्याय राहिला नव्हता. (latest marathi news)

त्यामुळे रिक्षा चालकांची चांगलीच चंगळ झाली होती. विविध मार्गावरील रिक्षाचालक प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे घेताना आढळून आले. विशेष करून शालीमार ते नाशिक रोड, द्वारका ते नाशिक रोड या भागावरील रिक्षाचालक मनमानी पद्धतीने भाडे आकारताना आढळून आले. शालिमार ते नाशिक रोड रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून दहा ते वीस रुपये अतिरिक्त घेतल्याचे प्रवासंकडून सांगण्यात आले.

इतकेच नाही तर एका रिक्षात क्षमतेपेक्षा अधिक मागेपुढे प्रवासी बसवून वाहतूक करण्यात आली. चालकाच्या छोट्याशा सीटवरदेखील चालकासह अन्य दोन प्रवासी प्रवास करताना आढळून आले. अतिरिक्त पैसे आणि प्रवासी यामुळे रिक्षा चालकांचा व्यवसाय जोरदार सुरू होता. तर दुसरीकडे चालकाशेजारी अतिरिक्त प्रवासी बसवून वाहतूक केली जात असल्याने चालक आणि प्रवाशांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. अशाच प्रकारचे चित्र शहराच्या विविध भागात बघावयास मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening Bell : नोव्हेंबरची सुरुवात घसरणीने! पण बाजारात पुन्हा तेजीचा सूर? जाणून घ्या शेअर बाजारातील घडामोडी

Gold Rate Today: खुशखबर ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने झाले स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

राजू शेट्टींना कन्नड भाषेतच बोलण्याचा आग्रह, मराठी बोलण्यास विरोध; कर्नाटकात शेतकरी नेत्याला बोलूच दिलं नाही, कन्नड संघटनांचा संताप

Pune Weather : पुणेकरांना मोठा दिलासा! सलग तीन दिवस पावसाची उघडीप कायम; मात्र तापमानाचा पारा ३० अंशावर

Alandi Weddings : गुरू-शुक्राच्या अस्तामुळे आळंदीत विवाह मुहूर्त कमी, कार्यालय बुकिंगला थंड प्रतिसाद

SCROLL FOR NEXT