A Citylink bus standing at the bus stop at Tapovan. esakal
नाशिक

Nashik Citylinc Employees Strike : सिटीलिंक कर्मचारी पुन्हा संपावर; 2 महिन्याचे वेतन थकल्याने सेवा ठप्प

Citylinc Employees Strike : दोन महिन्याचे वेतन थकल्याने गुरुवारी (ता. १४) सिटी लिंक बस चालक, वाहन यांनी पुन्हा संपाचे हत्यार उपसले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Citylinc Employees Strike : दोन महिन्याचे वेतन थकल्याने गुरुवारी (ता. १४) सिटी लिंक बस ( Citylinc )चालक, वाहन यांनी पुन्हा संपाचे हत्यार उपसले. पहाटे तपोवन येथील वाहनतळातून एकही बस बाहेर पडली नाही. संपावर सायंकाळ सहापर्यंत काही तोडगा न निघाल्याने प्रवासी, विद्यार्थी यांना दिवसभर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. संपात सुमारे १०० हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. (nashik Citylink workers on strike again Service stopped marathi news)

सेवा सुरु झाल्यापासून आतापर्यंत कर्मचाऱ्यांकडून वेतनासाठी हा नववा संप करण्यात आला आहे. वेतन होत नसल्याने काही दिवसांपूर्वी सिटी लिंक बसच्या चालक आणि वाहन यांनी संप पुकारला होता. त्यावेळी त्यांना आश्‍वासन मिळाल्याने संप स्थगित करण्यात आला होता. मात्र पुन्हा दोन महिन्याचे वेतन न मिळाल्याने शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांनी गुरुवारी पहाटे कामबंद आंदोलन पुकारत एकाही बस पहाटे वाहनतळातून बाहेर काढली नाही. (latest marathi news)

मासिक वेतन वेळेवर करण्यात यावे, दोन महिन्याचे रखडलेले वेतन तत्काळ अदा करावे, पीएफ, ईएसआय वाहक यांच्या नावाने भरला जावा. यासह इतर प्रलंबित मागण्यासाठी हे कामबंद आंदोलन करण्यात आले. तसेच या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यावर हे कर्मचारी ठाम आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून वेतनवाढ झालेली नाही. गेल्या दोन वर्षे कोणत्याही प्रकारचा बोनस देण्यात आलेला नाही. यासह कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह खात्यात निधी देखील भरलेला नाही. सिटीलिंक प्रशासन व ठेकेदार संगनमताने कर्मचारी वर्गाची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही यावेळी कर्मचाऱ्यांनी केला. संपात काही कर्मचारी सहभागी न झाल्याने शहरात काही प्रमाणात सेवा देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

Rupali Chakankar: तर लैंगिक छळाची घटना टळली असती; रूपाली चाकणकर, २०२३ मध्ये दाखल केलेल्या तक्रारीची दखल का घेतली नाही?

SCROLL FOR NEXT