Vinay Patil, Janhvi Shekhar utsav raka, Sagar Bhamre aavishkar Durley, Kunal Ahirrao Prashant Dagle, Priyanka Mohite bhamare sagar esakal
नाशिक

Civil Services Exam : नागरी सेवा परीक्षेत नाशिकच्या 8 जणांचे यश! विनय 122 वा, जान्‍हवी 145 वी

Civil Services Exam : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२३ चा अंतिम निकाल मंगळवारी (ता.१६) जाहीर झाला.

सकाळ वृत्तसेवा

Civil Services Exam : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२३ चा अंतिम निकाल मंगळवारी (ता.१६) जाहीर झाला. या परीक्षेत नाशिकच्‍या आठ उमेदवारांनी यश मिळविल्याने त्यांना प्रशासकीय सेवेचे द्वार खुले झाले आहे. विनय सुनील पाटीलने १२२ वा, जान्‍हवी शेखर हिने १४५ वा क्रमांक पटकावला आहे. तर उत्‍सव राका, सागर भामरे, प्रियांका मोहिते, आविष्कार डर्ले, कुणाल अहिरराव, प्रशांत डगळे, सूरज निकम यांनी यश मिळविले आहे. (nashik Civil Services Exam Success of 8 people from Nashik in Civil Services Exam marathi news)

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे नागरी सेवा परीक्षा २०२३ चे आयोजन गेल्‍या वर्षी सप्‍टेंबर महिन्‍यात केले होते. तसेच मुलाखतीचे आयोजन यंदा जानेवारी ते एप्रिलदरम्‍यान केले होते. त्‍या आधारे निवड यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत निळवंडी (ता. दिंडोरी) येथील विनय सुनील पाटील १२२ व्‍या क्रमांकावर राहिला. नाशिकची जान्‍हवी शेखर १४५ व्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. (latest marathi news)

शहरातील उत्‍सव राका २७० वा, वनोली (ता. बागलाण) येथील सागर संजय भामरे ५२३ वा, येवला तालुक्‍यातील प्रियांका सुरेश मोहिते ५९५ वी, शिंगवे (ता. निफाड) येथील आविष्कार विजय डर्ले ६०४ वा, लखमापूर (ता. बागलाण) येथील सूरज प्रभाकर निकम हा ७०६ वा, ओझर येथील कुणाल अहिरराव ७३२ वा आणि जेलरोड येथील प्रशांत डगळे ७७५ व्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.

या यशस्‍वी उमेदवारांमध्ये जान्‍हवी आणि प्रशांत यांनी दुसऱ्यांदा यश मिळविले आहे. आयोगाने गुणवत्ता यादी व अखिल भारतीय सेवांसाठी निवड झालेल्‍या उमेदवारांच्‍या नावाचा तपशील जारी केला आहे. यामध्ये अखिल भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) साठी १८०, आयएफएससाठी ३७, आयपीएससाठी २००, केंद्रीय सेवा गट अ साठी ६१३, गट ब साठी ११३ अशा एकूण एक हजार १४३ उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

Mumbai Traffic: मुंबईतील वाहतुकीत बदल, 'या' मार्गावर महिनाभर नो एन्ट्री; काय असतील पर्यायी मार्ग?

SCROLL FOR NEXT