Nashik Municipal Commissioner Ramesh Pawar
Nashik Municipal Commissioner Ramesh Pawar sakal
नाशिक

स्‍वच्‍छ, सुंदर अन् स्‍वस्थ 'नाशिक' निर्माण करू : आयुक्त

अरुण मलाणी

नाशिक : जागतिक वसुंधरा दिनानिमित्त राबविलेल्‍या ‘नदी वाचवा’ अभियानाला नाशिककरांनी दिलेला प्रतिसाद कौतुकास्‍पद आहे. शहराच्‍या विकासाचे ध्येय्य साध्य करत असताना स्‍वच्‍छतेकडे दुर्लक्ष होणार नाही, याची जबाबदारी आम्‍ही महापालिका प्रशासन म्‍हणून पार पाडतो आहोत. नागरिकांच्या साथीने शहराचा नावलौकिक वाढविता येऊ शकतो. स्‍वच्‍छ नाशिक, सुंदर नाशिकसोबत स्‍वस्‍थ नाशिक निर्माण करण्यासाठी प्रत्‍येक नागरिकाने आपल्‍या पद्धतीने प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहन नाशिक महापालिका आयुक्‍त तथा प्रशासक रमेश पवार यांनी ‘सकाळ’ च्‍या माध्यमातून केले.

श्री. पवार म्‍हणाले, की नदी वाचवा अभियानातून झालेली स्‍वच्‍छता पुढेदेखील कायम राखली जाईल, असा विश्‍वास आहे. महापालिकेकडे सुमारे तीन हजार स्‍वच्‍छता कर्मचारी आहेत. पंचवीस लाख लोकसंख्या असलेल्‍या या शहरात उर्वरित २४ लाख ९७ हजार नागरिकांच्‍या सहकार्याशिवाय स्‍वच्‍छता कर्मचारी शहराला स्‍वच्‍छ ठेऊ शकत नाहीत. त्यामुळे प्रत्‍येक नागरिकाने स्‍वच्‍छतेसाठी आपल्‍या स्‍तरावर योगदान दिल्‍यास यंत्रणेला सहकार्य होईल. रोगराई कमी होऊन नागरीकांना स्‍वस्‍थ व राहाण्यायोग्‍य वातावरण उपलब्‍ध होईल. पायाभूत सुविधा, वातावरण यांसह अन्‍य विविध बाबींमुळे नाशिक सर्वांच्‍या आकर्षणाचा केंद्र राहिले आहे. त्‍यास स्‍वच्‍छ शहर म्‍हणून ओळख प्रस्‍थापित केल्‍याने औद्योगिक कंपन्‍या, गुंतवणूकदार अधिक प्रमाणावर आकर्षित होतील, असा विश्‍वास श्री. पवार यांनी व्‍यक्‍त केला.

आता मलजलवाहिन्यांबाबत विशेष मोहीम

आगामी काळात मलजलवाहिन्‍यांसंदर्भात विशेष मोहीम राबविली जाणार आहे. शहरातील काही भागांमध्ये मलजल वाहिन्या या पर्जन्‍य जलवाहिन्‍यांना जोडल्‍याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे हे मलजल प्रक्रिया न होताच पात्रात जात असल्‍याने आरोग्‍याचा प्रश्‍न निर्माण होतो. यापूर्वीच नागरीकांना दुरुस्‍तीचे आवाहन केलेले आहे. इमारतींमधील मलजल हे योग्‍य पद्धतीने मलजल वाहिनीच्‍या माध्यमातून मलनिस्सारण केंद्रात योग्‍य ती प्रक्रिया केल्‍यानंतरच पात्रात सोडले जाईल, यासंदर्भात खबरदारी घेतली जाणार आहे. नदी पात्रातील प्रदूषित पाण्याला अटकाव करण्यात या माध्यमातून यश येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC T20 World Cup Anthem : आयसीसीने टी 20 वर्ल्डकपचे नवे अँथम साँग केले प्रसिद्ध; ग्रॅमी पुरस्कार प्राप्त बाल्फेंची आहे निर्मिती

Jalgaon Crime News : सराफ बाजार दरोडा! तिघांना 7 दिवस कोठडी; दोघा भावंडांनाही अटक

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

Dombivli MIDC Blast : आचारसंहिता होती अन्यथा...डोबिंवलीतील MIDC हलवण्याबाबत उद्योगमंत्र्यांचं मोठं विधान

Dombivli MIDC Blast Live Update: डोंबिवलीतील स्फोटात सहा मृत्यू तर ३८ जण रुग्णालयात दाखल - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT