नाशिक

मुख्यमंत्र्यांच्या शहर पोलिसांना काचपिचक्या

CD
फोटो क्रमांक --------------- बंदोबस्ताच्या अतिरेकावर मुख्यमंत्री नाराज शहर पोलिसांना कानपिचक्या ः कार्यक्रम नागरिकांसाठी अन त्यांनाच ठेवले दूर ---------------- सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ११ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी (ता. ११) दुपारी समृद्ध पंचायत राज पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी नाशिकला आले असता, या दरम्यान पोलिसांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला. परंतु मुख्यमंत्र्यांनी जाहीर कार्यक्रमात पोलिसांच्या बंदोबस्ताच्या अतिरेक पाहून कानपिचक्या दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समृद्ध पंचायत राज पुरस्कार सोहळ्यासाठी नाशिक दौऱ्यावर होते. आडगाव शिवारातील पार्क साइडलगतच्या मैदानावर कार्यक्रम झाला. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहर पोलिसांकडून कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. सभा मंडपातील मुख्य व्यासपीठासमोर सुरक्षेच्या कारणास्तव डी झोन होता. मात्र पोलिसांनी डी झोनपासूनही सुमारे शंभर ते दीडशे मीटरपर्यतची जागा प्रतिबंधित केलेली होती. मुख्यमंत्री फडणवीस हे उपस्थितांशी संबोधन करण्यासाठी उभे राहिले असता, त्यांनी पोलिसांच्या या नियोजनावर तीव्र शब्दात जाहीर कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली. नागरिकांसाठी कार्यक्रम असताना, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी जवळीक साधायची असते. परंतु व्यासपीठापासून इतक्या अंतरावर नागरिक असतील तर संवाद कसा साधणार? उपस्थित नागरिकांमध्ये आणि माझ्यात एका क्रिकेटच्या मैदानाइतकं अंतर आहे. समोरील व्यक्तीच दिसू नये, इतकंही अंतर नसावे. सुरक्षा महत्त्वाची असली तरी दुरावा नसावा, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना बंदोबस्तावरून कानपिचक्या दिल्या. ........ १६-१ अन्‌ सुटकेचा सोडला श्‍वास पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलेले आहे तर, देशातही सीजेपीने निवडणूक आयुक्तांविरोधात आंदोलन दिल्ली सुरू आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण तणावाचे असताना, नाशिक शहर पोलिसांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. कार्यक्रमस्थळी पोलिसांकडून करडी नजर ठेवण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांविरोधात आंदोलकांकडून गनिमी काव्याने कार्यक्रमात गोंधळ घालण्याचीही वा निषेधाच्या घोषणाबाजी करण्याची शक्यता होती. परंतु पोलिसांच्या कडेकोट नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. त्यामुळे पोलिसांसह जिल्हा प्रशासनाने सुटकेचा श्‍वास घेतला. -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT