नाशिक

नाशिकमध्ये २१ नवीन सीएनजी पंप

CD
मेन सीएनजीसाठी वेटिंग संपणार; जिल्ह्यात २१ नवीन पंप सिंहस्थ कुंभमेळ्यात ५० टक्के भाविक खासगी वाहनांनी येण्याचा अंदाज सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ७ : सिंहस्थ कुंभमेळ्यात देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून खासगी वाहनाने येणाऱ्या भाविकांना अखंडित सीएनजी पुरवठ्यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या पुढाकारातून जिल्ह्यात २१ ठिकाणी नव्याने सीएनजी पंप उभारण्यात येणार आहे. इंधन पुरवठादार कंपन्यांकडून त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्‍वर येथे ३१ ऑक्टोबरला ध्वजारोहणाने सिंहस्थ पर्वास प्रारंभ होणार आहे. यंदाच्या कुंभपर्वाचा कालावधी २२ महिन्यांचा आहे. देश- विदेशातून १२ कोटी भाविक, पर्यटक तसेच साधू महंत सिंहस्थात हजेरी लावतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर नियोजन केले जात आहे. रेल्वे, विमानसेवा तसेच खासगी वाहने अशा तीन टप्यात भाविक जिल्ह्यात येतील. त्यामध्ये खासगी वाहनांनी साधारणत: ५० टक्के भाविक येतील, असा अंदाज आहे. त्यामध्ये बस, एसटी तसेच मोठ्या वाहनांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त टॅक्सी, कार व स्थानिक स्तरावर रिक्षांसह व्यावसायिक वाहनांची संख्येतही भर पडण्याची शक्यता आहे. परिणामी सध्याच्या सीएनजी पंपावर अतिरिक्त ताण वाढणार आहे. जिल्ह्याभरात सद्यस्थितीत सीएनजीचे २३ पंप कार्यरत आहेत. त्यामधील आठ पंप ऑनलाइन पद्धतीचे असून ऊर्वरित पंप ऑफलाइन पद्धतीने चालविले जातात. मात्र, वाहनांची संख्या, गॅसची मागणी तसेच पुरवठ्यातील विलंबामुळे वाहनधारकांना पंपावर तासन्‌तास ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे पेट्रोल -डिझेलसह सीएनजीच्या पुरवठ्यासाठी नव्याने २१ पंप उभारण्यात येणार आहेत. या पंपामुळे येणाऱ्या भाविकांना वेळेत सीनएजी उपलब्ध होण्यास मदत मिळेल. ---चौकट वितरणासाठी जाळे जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या पंपांना नियमित व सुरळीतपणे सीएनजी पुरवठ्यासाठी गॅस पाइपलाइन, वाहतूक व्यवस्था, वितरण क्षमता आणि ऑनलाइन पुरवठा यंत्रणांचाही विस्तार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने सीएनजी स्टेशनशी संबंधित विविध कामांसाठी निविदा प्रक्रियेची तयारी सुरु केल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे पंपांची संख्या वाढविण्यासह सीएनजी वितरणाचे जाळे मजबूत होण्यास हातभार लागणार आहे. --- गॅस सिलिंडरसाठी नियोजन *सिंहस्थ कालावधीत एलपीजी सिलिंडरच्या मागणीत वाढ होणार आहे. * पुरवठा विभागाने त्या दृष्टीने गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या तिन्ही कंपन्यांना सुक्ष्म नियोजन आराखडा तयार करावा, अशा सूचना केल्या आहेत. * मागणीच्या तुलनेत पुरवठा, पुरवठ्यासाठी मार्ग व आपत्कालीन परिस्थितीत करायच्या उपाययोजनांवर आराखड्यात भर दिला जाणार आहे. --- तात्पुरते रेशन दुकाने सिंहस्थ कालावधीत आखाडे व खालसे तसेच धार्मिक आणि सेवाभावी संस्थांकडून लंगर चालविले जातात. रेशन व्यवस्थेतंर्गत सरकार या सर्व संस्थांना धान्य तसेच अन्य साहित्याचा पुरवठा करते. त्या दृष्टीने साधुग्राम तसेच प्रमुख ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात रेशन दुकाने उभारण्यासंदर्भात पुरवठा विभाग काम करते आहेत. तसेच या रेशन दुकानांमधून तात्पुरते रेशनकार्ड वितरणासह इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्राथमिक तयारी केली जात आहे. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT