Nashik cold increase by 10.4 Degree
Nashik cold increase by 10.4 Degree esakal
नाशिक

Nashik : महाबळेश्वर पेक्षाही नाशिक थंड; पारा 10.4 अंशावर - दिवसभर हवेत होता गारवा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून नाशिकसह राज्यभर थंडीचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान घसरले आहे. जिल्ह्यात हुडहुडी भरली असून अचानकपणे नाशिक शहराचा पारा थेट १०.४ अंशापर्यंत घसरला आहे. त्यामुळे सकाळपासून हवेत प्रचंड प्रमाणात गारवा जाणवू लागला आहे.

गत काही दिवसांपासूनच पारा घसरत असल्याने नाशिककरांनी स्वेटर परिधान करण्यास सुरवात केली आहे. नाशिककरांना हुडहुही भरू लागल्यामुळे जीम क्रीडांगणे, जॉगिंग पार्क, रस्त्यावर फेरफटका मारणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

जिल्हयाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडला नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. अवघे ८.१ अशांवर पारा येऊन थांबला आहे. मात्र दुसरीकडे थंडी वाढल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. (Nashik colder than Mahabaleshwar Mercury hovered at 10.4 degrees chilli throughout day Nashik News)

नाशिक शहर आणि परिसरात थंडीचा कडाका वाढला असून गेल्या चार दिवसांपासून तापमाचा पारा १०.४ अंशांपर्यंत खाली आला आहे. जिल्हयाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडला नीचांकी तापमानाची नोंद झाली असून अवघे ८.१ अशांवर पारा येऊन थांबला आहे. नोव्हेंबर संपायला आला तरी नाशिकमध्ये कडाक्‍याची थंडी जाणवत नव्‍हती.परंतू, चार दिवसांमध्ये तापमानामध्ये कमालीची घट झाली आहे.

गेल्‍या काही दिवसांपासून तापमानात किरकोळ घसरण होण्यास सुरवात झाली आहे. त्‍यातच शनिवारी किमान तापमान १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे ग्रामीण शेकोट्या पेटत असून शहरात जिम, क्रीडांगणे, जॉगिंग ट्रॅकवर गर्दी पहायला मिळत आहे. त्यामुळे जॉगिंग ट्रक फुलले असून नाशिककर सध्या गुलाबी थंडीचा आनंद घेत आहे.

शहरातील मागील पाच तापमानाची आकडेवारी पहिली तर लक्षात येईल कि, एक एक अंशाने तापमानात घट झाली आहे. मंगळवार १५.२, बुधवार १४.४, गुरुवार १३.९, शुक्रवार ११.२ तर आज शनिवारी १०.४ इतके नोंदवले गेले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांचा विचार करता किमान तापमानाचा पारा चढता आणि कमाल तपमानाचा पारा उतरता होता. शनिवारी किमान तपमान १०.४ अंश इतके नोंदविले गेले. यामुळे नाशिककरांना थंडीची तीव्रता अनुभवयास येत आहे. त्यामुळे नोंव्हेबर अखेर थंडीचा कडाका अधिक वाढणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे.महाबळेश्वर पेक्षाही नाशिक थंड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident : कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीला शिक्षा होणार का? देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्ट संकेत

HSC Result: बारावीनंतर नोकरी करायची आहे ? रेल्वेमध्ये करा उत्तम करिअर, टीटीई होण्यासाठी अशी करा तयारी

Indigo Flight : इंडिगोची फ्लाइट की रेल्वेचा जनरल डबा! ओव्हरबुक झाल्याने प्रवाशाचा उभे राहून प्रवास, अखेर...

Gautam Gambhir: 'धोनी ज्याप्रकारे स्पिनर्सचा...', चेन्नई-कोलकाता लढतीबद्दल गौतम गंभीर काय म्हणाला?

Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाने दारू प्यायलेला पब करण्यात आला सील; मालकासह मॅनेजरला ४ दिवसांची कोठडी

SCROLL FOR NEXT