Admission  esakal
नाशिक

Junior Collage Admission : 5 जूनपासून भरा अकरावी प्रवेश अर्जाचा भाग 2

Nashik News : नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठीच्‍या प्रक्रियेला गती आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठीच्‍या प्रक्रियेला गती आली आहे. अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया ५ जूनपासून सुरु होत आहे. दरम्‍यान आत्तापर्यंत नऊ हजार ५५८ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी करताना अर्जाचा भाग एक भरला आहे.

राज्‍यातील प्रमुख महापालिका क्षेत्रामध्ये इयत्ता अकरावीसाठी ऑनलाइन केंद्रभूत पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झालेला असताना आता विद्यार्थी, पालकांना पुढील प्रवेशाचे वेध लागले आहे.

दरम्‍यान शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता इयत्ता अकरावीत प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्‍छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नोंदणी करून वैयक्‍तिक तपशीलाचा समावेश असलेला अर्जाचा भाग एक भरायचा आहे. (latest marathi news)

या अर्ज प्रक्रियेत अर्जाचा भाग दोन महत्त्वाचा मानला जातो. यामध्ये विद्यार्थ्यांना त्‍यांना प्रवेश घ्यावयाचा असलेल्‍या शाखा व महाविद्यालयांची निवड करायची असते. किमान एक तर कमाल दहा पर्याय विद्यार्थी नोंदवू शकतात.

त्‍यानुसार आता अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया ५ जूनपासून सुरु होत आहे. अर्ज प्रक्रिया पार पडल्‍यानंतर प्रवेश फेर्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्यांच्या ठसक्याने रंगायचा लावणीचा फड! त्या शकुंतलाताई नगरकर काळाच्या पडद्याआड, कलाविश्वात

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

IND vs NZ T20I Squad: भारत-न्यूझीलंड ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघ जाहीर; अष्टपैलू खेळाडूची माघार, १५ जणांची तगडी टीम

Marathi News Live Updates : माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळली

PITRU PAKSHA 2026 VASTU TIPS: घरात सुख-शांती आणि सकारात्मकता राहिल टिकून! पितृपक्षापूर्वी फक्त 'या' ४ वस्तू बाहेर काढा

SCROLL FOR NEXT