Increased encroachment at Shalimar Chowk and rickshaws parked in the middle of the road by rickshaw pullers.
Increased encroachment at Shalimar Chowk and rickshaws parked in the middle of the road by rickshaw pullers. esakal
नाशिक

Nashik Traffic Problem : शालिमार चौकास अतिक्रमणधारकांचा गराडा; रिक्षाचालकांची सर्रास मनमानी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : बेशिस्त रिक्षाचालक आणि छोटे, मोठे विक्रेत्यांनी शालिमार चौकाला घातलेल्या गराड्यामुळे हा चौक अरुंद बनला आहे. यामुळे येथे दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास नाहक सर्वसामान्य चालक, नागरिक यांना सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे याठिकाणी वाहतूक शाखेची पोलिस चौकी असूनही याठिकाणी बेशिस्त रिक्षाचालक उभे राहूनही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने याचे आश्‍चर्य सर्वांना वाटते. (Nashik Common drivers and citizens are suffering from traffic jam in Shalimar)

शालीमार शहरातील मुख्य चौक तसेच बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. नाशिकरोड रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या बसेस देखील येथूनच जातात. शालिमार चौकात उत्तर महाराष्ट्रातील एकमेव संदर्भ रुग्णालय आहे. दैनंदिन याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. बस स्थानकावर महाविद्यालयातील तरुण-तरुणी, शाळेतील विद्यार्थी बाजारपेठेत खरेदीसाठी येणारे नागरिक थांबत असतात.

अशा मुख्य चौकाचा ताबा अतिक्रमणधारक, फेरीवाले व बेशिस्त रिक्षाचालकांनी घेतला आहे. सर्रास भर रस्त्यावर फेरीवाले अतिक्रमण करून थांबत असतात. रिक्षा चालकांकडून तर संपूर्ण रस्ताच व्यापून घेतला जातो. रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभे करून प्रवाशांची वाट बघत असतात. अशा वेळेस शहर बसचालकांना तेथून बस काढणे जिकरीचे होऊन जाते. (latest marathi news)

अन्य वाहनधारकांनाही रिक्षाचालकांच्या मुजोरीचा सामना करावा लागतो. यावेळी जर कोणी त्यांना हटकल्यास त्यांना मारहाण केली जाते. विशेष म्हणजे वाहतूक शाखेच्या चौकीसमोर दररोज घडत असतो.

वाहतूक चौकीसमोर बेशिस्त रिक्षाचालकांची मनमानी

शालिमार चौकात वाहतूक नियमांचे पालन व्हावे. बेशिस्त रिक्षा चालकांवर वचक बसावा. यासाठी वाहतूक चौकी उभारण्यात येऊन कर्मचारी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. असे असताना चौथी समोर सर्रास रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा चालकांकडून मनमानी करत रिक्षा उभ्या केल्या जातात.

त्यातून अपघातास निमंत्रण मिळत वाहतूक कोंडी होत असते. पण याठिकाणी ‘नो एन्ट्री’ च्या नियम उल्लंघन करणाऱ्यांवर वाहनांवर सतत कारवाई केली जाते. मात्र बेशिस्त रिक्षाचालकांकडे डोळे झाक केली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून नेहमीच करण्यात येतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT