election  esakal
नाशिक

Nashik News : पोलिस सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी चुरस; सोमवारी नूतन अध्यक्षाची निवड

Nashik News : शहर-ग्रामीण पोलिस कर्मचाऱ्यांची नाशिक पोलिस को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर आता अध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील शहर-ग्रामीण पोलिस कर्मचाऱ्यांची नाशिक पोलिस को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर आता अध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. येत्या सोमवारी (ता. ५) अध्यक्षपदाची निवड केली जाणार असून यासाठी इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे नऊ तर प्रगतीचे सहा उमेदवार विजयी झाले असून, दक्षता पॅनलचा एकही उमेदवार विजयी होऊ शकलेला नाही.

नाशिक पोलिस को-ऑपरेटिव्ह सोसायटीसाठी गेल्या २१ जुलैला मतदान होऊन दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर झाला होता. यात सर्वसाधारण गटातून प्रगती पॅनलचे विक्रम कडाळे, गणेश कोंडे, अविनाश जुंदरे, कपालेश्वर ढिकले, गणेश पिंगळे, तर परिवर्तन पॅनलचे विशाल काठे, संदीप झाल्टे, प्रशांत मरकड, रूपेश मुळाणे.

संदीप हांडगे विजयी झाले. महिला राखीव गटातून प्रगतीच्या अश्विनी देवरे व परिवर्तनमधून योगिता काकड तर, इतर मागास प्रवर्गातून परिवर्तनचे उमेदवार योगेश राऊत, अनुसूचित जाती जमातीतून जालिंदर खराटे, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातून विश्वनाथ काकड हे विजयी झाले होते. (latest marathi news)

दरम्यान, सोमवारी (ता. ५) सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी बैठक होत आहे. या वेळी सोसायटीच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे पोलिस सभासदांचे लक्ष लागले आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. परिवर्तन पॅनलकडे बहुमत असल्याने त्यांचाच अध्यक्ष होण्याची चिन्हे असली एकापेक्षा अधिक उमेदवार असल्यास संचालकांच्या मतदानातून निवड केली जाण्याची शक्यता आहे.

पोलिस सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी रूपेश मुळाणे, योगिता काकड, जालिंदर खराटे, संदीप हांडगे हे संचालक इच्छुक आहेत. परंतु उर्वरित संचालकांमधून बैठकीत दावा केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सोमवारच्या बैठकीत नूतन अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असून, त्याकडेच पोलिस सभासदांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT