free school uniform for Zilla Parishad students  esakal
नाशिक

Nashik ZP News : जि.प. विद्यार्थी गणवेशाचा सावळागोंधळ सुरूच; पहिल्या दिवशी गणवेश मिळण्याबाबत प्रश्‍नचिन्ह

Nashik News : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव करण्याची जोरदार तयारी सुरू असताना दुसरीकडे मात्र, जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेशाचा गोंधळ मिटलेला नाही.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव करण्याची जोरदार तयारी सुरू असताना दुसरीकडे मात्र, जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेशाचा गोंधळ मिटलेला नाही. कापड देऊन तो गणवेश महिला आर्थिक विकास महामंडळाकडून शिलाई करून घेण्याचे ठरले. त्यानुसार कापड येण्याची प्रतीक्षा होती. प्रत्यक्षात कापड जिल्ह्याला प्राप्त झाले नाही. (confusion of free school uniform for Zilla Parishad students has not been resolved)

यातच आता गणवेश शिलाई करूनच दिला जाणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. शाळा सुरू होण्यास चार दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना कधी गणवेश मिळेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या गोंधळामुळे यंदा विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशावर प्रवेश करावा लागणार आहे. जिल्ह्यात तीन हजार २०० प्राथमिक शाळा आहेत. त्यातील विद्यार्थ्यांसाठी शासनातर्फे दोन मोफत गणवेश दिले जात आहेत.

मागील वर्षी ही गणवेश खरेदी शाळा व्यवस्थापनस्तरावर झाली होती. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांसह गणवेश मिळत होता. मात्र, गेल्या वर्षी शासनाने गणवेशवाटप धोरणात बदल करत, सर्व विद्यार्थ्यांना एकाच रंगाचा गणवेश देण्याचा निर्णय घेतला. यासाठी ठेकेदारांकडून कापड खरेदी करून ते महिला आर्थिक विकास महामंडळाकडून शिलाई करून विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत.

त्यानुसार राज्यातील काही जिल्ह्यांना कापडदेखील उपलब्ध करून देण्यात आले. मात्र, शाळा सुरू होण्यास अवघे चार दिवस शिल्लक राहिलेले असतानादेखील नाशिक जिल्ह्यात अद्यापही कापड प्राप्त झालेले नाही. कापड मिळत नसल्याने पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार नसून ते वंचित राहणार, अशी ओरड सुरू झाली. (latest marathi news)

ही ओरड सुरू झाल्यावर शिक्षण विभागाने पुन्हा घाईघाईत व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. यात गणवेशाचे कापड न पाठविता थेट शिलाई करून गणवेश देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता प्राथमिक शिक्षण विभागाला शिलाई केलेल्या गणवेशांची प्रतीक्षा आहे. ११ जून उजाडला असून, अद्यापही हे गणवेश मिळालेले नाहीत.

त्यामुळे हे गणवेश कधी प्राप्त होणार, विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप कधी करणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. शिक्षण विभागाच्या गोंधळामुळे पहिल्या दिवशी विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

Marathi News Live Updates: पाण्याची टाकी पाडताना जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Lung Health: तुमचं वय वाढतंय अन् फुफ्फुसे वेगाने थकतात! वयानुसार 'लंग हेल्थ' कडे दुर्लक्ष नका करू; वाचा काय सांगतात तज्ज्ञ...

SCROLL FOR NEXT