Foul smelling tap water esakal
नाशिक

Nashik News : 5 दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा; शिवपुरी चौकातील महिला वर्गात संतप्त भावना

Nashik : उत्तमनगर परिसरातील शिवपुरी चौक येथे गेल्या चार ते पाच दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने महिला वर्गात संतप्त भावना उमटत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : उत्तमनगर परिसरातील शिवपुरी चौक येथे गेल्या चार ते पाच दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने महिला वर्गात संतप्त भावना उमटत आहेत. शिवपुरी चौक येथे सायंकाळी पाणीपुरवठा होत असतो. मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून होणाऱ्या पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजच्या पाण्याचा वास येत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ()

याबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रार करूनही दुर्गंधीयुक्त दुषित पाणीपुरवठा सुरू असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रश्नाकडे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दुर्लक्ष केल्याने महिला वर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

तरी शिवपुरी चौकात स्वच्छ पाणीपुरवठा न झाल्यास नागरिकांतर्फे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सचिन परदेशी, बाळासाहेब भगत, शिवाजी भोज, दत्तू चिखले, कमलेश पाटील, विनय मोहोड, दिपक पाटील, सिद्देश सानप, आशा परदेशी, नंदा चिखले, संगीता सायंदर, शैला भगत, शितल कोठुळे, सुरेखा पाटील, जयश्री रोकडे, ताराबाई गुरव आदींसह परिसरातील नागरिकांनी दिला आहे. (latest marathi news)

तक्रार करूनही दखल नाही

सहा महिन्यांपासून सिडको परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याबाबत आणीबाणी सुरू असल्याचे दिसून येत आहे. वारंवार तक्रार करूनही मनपा प्रशासनातील अधिकारी कुठल्याही प्रकारची तजवीज करताना दिसत नाही. नळांना दुर्गंधीत पाणी येणे, कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, काही भागांमध्ये पाणीच न येणे यामुळे काही भागांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ नागरिकावर आल्याने महिला वर्गात मोठ्या प्रमाणात संतापाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT