Tax collection board in market since five years ago. esakal
नाशिक

Nashik News : वणी आठवडे बाजारात ठेकेदाराची मनमानी; जादा करवसुलीने व्यापाऱ्यांसह शेतकरी त्रस्त

Nashik : दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात ठेकेदार शेतकरी-विक्रेत्यांकडून मनमानी करवसुली करीत असून, दरपत्रकाच्या फलकाचे बंधन पायदळी तुडविले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

वणी : येथे दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात ठेकेदार शेतकरी-विक्रेत्यांकडून मनमानी करवसुली करीत असून, दरपत्रकाच्या फलकाचे बंधन पायदळी तुडविले जात आहे. शेतकरी व व्यापाऱ्यांना आवश्यक सुविधा दिल्या जात नसल्याने विक्रेते व शेतकरी त्रस्त झाले आहेत. आठवडे बाजार करवसुली ठेकेदाराकडून केली जाते. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत करवसुलीसाठी ठेका दिला आहे. (Nashik contractor is collecting arbitrary tax from farmers vendors in Vani Week market)

ग्रामपंचायत प्रशासनाने ठरवून दिलेल्या दराच्या चार ते पाचपट करवसुली केली जाते. याबाबत ठेकेदाराची मनमानी सुरू आहे. भाजीपाला पाटी किंवा कॅरेटसाठी दहा रुपये कर आकारला पाहिजे. मात्र, कधी ३० तर कधी चाळीस रुपये आकारण्यात येतात. १० बाय १५ फुटाच्या दुकानाच्या पालास २० रुपये कर आकारणीऐवजी १०० ते १५० रुपयांची.

तर कधी २०० रूपयांची आकारणी केली जात आहे. परिणामी, बाजारात शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची माल विक्रीस आणण्यासाठी संख्या रोडावली आहे. आठवडे बाजार करवसुलीचा लिलाव ३२ लाखांना गेला आहे. करवसुली करताना ठेकेदाराकडून जास्तीचा कर आकारला जातो. त्याच्या पावत्या दिल्या जात नाही.

सुविधांची वाणवा

आठवडे बाजार करवसुली ठेक्याची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. ४० टक्के रक्कम अजूनही ठेकेदाराकडून ग्रामपंचायतीस येणे बाकी आहे. आठवडे बाजारात ग्रामपंचायतीचा दरफलकही लावलेला नाही. शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा व शौचालयही नाही. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे.(latest marathi news)

"वणी आठवडे बाजारात तीन कॅरेट वांगे विक्रीसाठी आणले असता, विक्री पावती म्हणून शंभर रुपये घेतले. मात्र, पावती दिली नाही. बाजारात शेतीमाल आणण्याचे भाडे, बाजारात अव्वाच्या सव्वा वसुली होत असल्याने शेतमाल विक्रीस आणायला परवडत नाही.'-देविदास चव्हाण, शेतकरी, अहिवंतवाडी

"वणी आठवडे बाजारात ठेकेदाराकडून मनमानीने वसुली होत असल्याच्या शेतकरी व व्यापाऱ्यांच्या तक्रारी आहेत. याबाबत सरपंच, उपसरपंचांना माहिती दिली आहे. ग्रामपंचायतीने ठरवून दिलेल्या अटीशर्ती व ठरवून दिलेल्या दरानुसारच व्यापारी व शेतकऱ्यांनी कर द्यावेत. आलेल्या तक्रारींची ग्रामपंचायत प्रशासनाने कडक कारवाई करावी."-विजय बर्डे, ग्रामपंचायत सदस्य, वणी

"ठेकेदार जास्तीची करवसुली करीत असल्याची तक्रार आल्यास ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल. असा प्रकार घडत असल्यास त्याची चौकशी करण्यात येईल."-संजय देशमुख, ग्रामविकास अधिकारी, वणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT