नाशिक

पाककृती स्पर्धेत निफाड प्रकल्प प्रथम

CD
फोटो : 31835 नाशिक : जिल्हा परिषदेत महिल व बालविकास विभागातर्फे आयोजित पाककृती स्पर्धेत पदार्थांची चव घेताना सीईओ ओमकार पवार, सहायक जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आडे. निफाड-२ प्रकल्पाची पाककृती स्पर्धेत बाजी मालेगाव द्वितीय, रावळगाव तृतीय; पोषणयुक्त आहाराचा संदेश सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.९ : जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धेत निफाड-२ (मनमाड) प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला. मालेगाव (ग्रामीण) प्रकल्पाने द्वितीय, तर रावळगाव (मालेगाव) प्रकल्पाने तृतीय क्रमांक मिळविला. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. पोषण महा २०२६ अंतर्गत शुक्रवारी (ता. ९) जिल्हा परिषदेत ही स्पर्धा झाली. गर्भवती व स्तनदा मातांचा आहार, सहा वर्षांपर्यंतच्या बालकांचे पोषण आणि कुपोषण प्रतिबंधाबाबत जनजागृती करणे हा स्पर्धेचा उद्देश होता. पोषणयुक्त व संतुलित आहारातून सुदृढ बालक घडविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. जिल्ह्यातील २६ बालविकास प्रकल्प कार्यालयांमध्ये प्राथमिक स्तरावर स्पर्धा घेण्यात आली. जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ पोषण आहार तज्ज्ञ रंजीता राजा, बालरोगतज्ज्ञ डॉ. अतुल काळे आणि पोषण पुनर्वसन केंद्रातील ज्योती गरड यांनी परीक्षण केले. मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांच्यासह वित्त व लेखा अधिकारी मारुती मुळे, पशुसंवर्धन अधिकारी संजय शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ आणि सहायक जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आडे यांनी स्टॉल्सची पाहणी केली. उत्तेजनार्थ पारितोषिके सुरगाणा, दिंडोरी आणि हरसूल येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDIA Bloc Vijay Chowk Protest: 'इंडिया' आघाडीचे नेते राष्ट्रपती भवनात; विजय चौकात खासदारांचे ठिय्या आंदोलन

MP OBC Reservation : मोठी बातमी! मध्य प्रदेशात 27 टक्के OBC आरक्षणाला उच्च न्यायालयाचा नकार; 14 टक्के आरक्षण कायम, रखडलेल्या 13 टक्के जागा भरण्याचेही निर्देश

CJPच्या आंदोलनापूर्वी गृह मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवी दिल्लीत ४ किमीच्या परिसरात इंटरनेट सेवा बंद

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! देशभरातील 23 राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; मॉन्सूनच्या परतीची सीमा कुठपर्यंत? महाराष्ट्रात वातावरण कसं?

Ab De Villier Hundred: ११ Six, ६ Fours! एबीच्या ४० चेंडूंत ११४ धावा; ऑस्ट्रेलियाला धुतले, २१० धावांचे लक्ष्य सहज पार केले, तोच जलवा...

SCROLL FOR NEXT