corona positive Google
नाशिक

Nashik : जिल्‍ह्याबाहेरील कोरोना रुग्‍ण ठरतायत तापदायक

अरुण मलाणी

नाशिक : परिस्‍थिती पूर्वपदावर येत असताना, राज्‍य शासनातर्फे निर्बंध शिथिल केले जात आहेत. असे असताना अन्‍य जिल्‍ह्यातील रुग्‍ण जिल्‍हावासीयांसाठी आता पुन्‍हा तापदायक ठरू लागले आहेत. ऑगस्‍टच्या १३ दिवसांत जिल्‍ह्याबाहेरील ७७ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. या कालावधीत आढळलेल्‍या एकूण बाधितांच्‍या तुलनेत हे प्रमाण सहा टक्‍के आहे. या बाधितांकडून कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका वाढला आहे.

ऑगस्‍टमध्ये जिल्‍ह्यात एकूण एक हजार २८९ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. यात जिल्‍हाबाहेरील आढळलेल्‍या कोरोनाबाधितांची संख्या ७७ आहे. या बाधितांपैकी गेल्‍या दोन दिवसांत प्रत्‍येकी अकराप्रमाणे २२ बाधितांचा समावेश आहे. यापेक्षा कमी कोरोनाबाधित मालेगाव महापालिका क्षेत्रात आढळले आहेत. एकंदरीत निर्बंध शिथिलतेमुळे वाहतूक व्‍यवस्‍था सुरळीत होत असली, तरी नवीन आव्‍हानामुळे निर्माण होऊ शकतात. नगर जिल्‍ह्यात कोरोना प्रादुर्भावाचे प्रमाण अधिक आहे. जिल्‍हालगतच्‍या अन्‍य जिल्‍ह्यांमध्ये काही प्रमाणात परिस्‍थिती चिंताजनक आहे. येत्‍या काळात अन्‍य जिल्‍ह्यातून येणारे नागरिकही जिल्‍हावासीयांची चिंता वाढवू शकतात. त्‍यामुळे अन्‍य जिल्‍ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी व अन्‍य आवश्‍यक बाबी तातडीने करण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे.

जिल्‍ह्याबाहेरील बाधितांची आतापर्यंतची स्‍थिती

आढळलेले एकूण बाधित : ५,६४२

कोरोनामुक्‍त : ५,५००

कोरोनाचे बळी : १२६

उपचार घेत असलेले रुग्‍ण : १६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

MD Drugs Crackdown: न्हावरेत एमडी ड्रग्सविरोधात संयुक्त धडक कारवाई; ११.९० लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे अटकेत तर एक फरार

Crime News: माळेगाव पोलिसांची अवैध दारू वाहतूक प्रकरणी कारवाई; दोन जण अटक, ४.४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

SCROLL FOR NEXT