Corona News Updates esakal
नाशिक

Corona Update : नाशिक जिल्ह्यात ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत 26 ने घट

कोरोनामुक्‍त रुग्‍णांच्‍या तुलनेत नव्‍याने आढळणाऱ्या बाधितांची संख्या अधिक राहात असल्‍याने सक्रिय रुग्‍णसंख्येत वाढ होत होती.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्‍या काही दिवसांपासून कोरोनामुक्‍त रुग्‍णांच्‍या तुलनेत नव्‍याने आढळणाऱ्या बाधितांची संख्या अधिक राहात असल्‍याने सक्रिय रुग्‍णसंख्येत वाढ होत होती. परंतु शनिवारी (ता.२५) जिल्ह्यात तब्‍बल ४६ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. दुसरीकडे वीस रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत २६ ने घट होऊन सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या २१४ झाली आहे. (Nashik Corona Update)

शनिवारी नाशिक महापालिका क्षेत्रात आठ, तर नाशिक ग्रामीण भागात अकरा रुग्‍णांना कोरोनाची लागण झाल्‍याचे निदान झाले. मालेगाव महापालिका क्षेत्रात नव्‍याने बाधित आढळला नाही. जिल्‍हाबाहेरील एका रुग्‍णाला कोरोनाची लागण झाल्‍याचे निदान झाले. नव्‍याने आढळणाऱ्या बाधितांच्‍या तुलनेत कोरोनामुक्‍तांची संख्या दिलासादायक आहे. पॉझिटिव्हिटी दर घटल्‍याने दुहेरी दिलासा नाशिकककरांना मिळाला आहे. शनिवारी नाशिक जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर १.५६ टक्‍के राहिला. तर काल तब्‍बल पावणेसहा टक्क्‍यांपर्यंत पोचलेला नाशिक महापालिका क्षेत्रातील शनिवारचा पॉझिटिव्हिटी दर १.४१ टक्‍के राहिला. सायंकाळी उशिरापर्यंत ३९३ अहवाल प्रलंबित होते. यापैकी २१९ प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीण भागातील होते. तर नाशिक शहरातील ९७, मालेगाव महापालिका क्षेत्रातील ७७ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा कायम होती. सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेल्‍या २१४ कोरोना बाधितांपैकी नाशिक शहरातील १३६, नाशिक ग्रामीणमधील ७०, मालेगाव महापालिका क्षेत्रातील एक, तर जिल्‍हाबाहेरील सात बाधितांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv News: अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन व कर्जबाजारीपणामुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्याने संपवले जीवन

Ladki Bahin yojana: बहिणींसाठी ‘ई-केवायसी’ रुसली; ‘कनेक्टिव्हिटी’सह संकेतस्थळ वारंवार बंद होत असल्याने मनस्ताप

IND vs PAK : B@#@# मुझे आंख दिखाती है! पाकिस्तानच्या फिरकीपटूने 'डोळे वटारले', हरमनप्रीत कौरने बघा काय केले? Video Viral

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

अरे वाह! 'या' मराठी अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, नवरा सुद्धा आहे 'या' मालिकेतील अभिनेता, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

SCROLL FOR NEXT