Nashik Corona updates esakal
नाशिक

Nashik Corona updates - जिल्‍ह्यात 41 पॉझिटिव्‍ह

नाशिक जिल्‍ह्यात कोरोना प्रादूर्भावाच्‍या दृष्टीने समाधानकारक स्‍थिती सध्या तरी बघायला मिळत आहे. गेल्‍या चार दिवसांपासून नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या पन्नासच्‍या आत राहत आहे.

अरूण मलाणी

नाशिक : जिल्‍ह्यात कोरोना (Corona) प्रादूर्भावाच्‍या दृष्टीने समाधानकारक स्‍थिती सध्या तरी बघायला मिळत आहे. गेल्‍या चार दिवसांपासून नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या पन्नासच्‍या आत राहत आहे. रविवारी (ता. २४) जिल्ह्यातील ४१ रुग्‍णांचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्‍ह आले. ५० रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केली. दोन बाधितांच्‍या मृत्‍यूची नोंद आहे. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात ७१७ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

ऑक्‍टोबर महिन्‍यात तीन वेळा दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या शंभराहून अधिक राहिली होती. ग्रामीण भागात प्रादूर्भाव वाढत असताना, सिन्नर, निफाड व येवला या तीन तालुक्‍यांत सर्वाधिक कोरोनाबाधित आढळत होते. मात्र, गेल्‍या चार दिवसांपासून नव्‍याने आढळणारे कोरोनाबाधित पन्नासपेक्षा कमी राहत आहेत.
रविवारी नाशिक शहरातील २३, नाशिक ग्रामीणमधील १६ रुग्‍णांना कोरोनाची लागण झाल्‍याचे निदान झाले. जिल्‍हाबाहेरील दोघांचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्‍ह आले. मालेगाव महापालिका क्षेत्रात नव्‍याने कोरोनाबाधित आढळला नाही. दोन बाधितांच्‍या मृत्‍यूची नोंद असून, यापैकी प्रत्‍येकी एक नाशिक शहर व नाशिक ग्रामीण भागातील आहे.

सायंकाळी उशीरापर्यंत ५४८ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक ग्रामीणमधील २४६, नाशिक शहरातील १८८, मालेगावच्‍या ११४ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ३८५ रुग्‍ण दाखल झाले. यापैकी ३८० रुग्‍ण नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. जिल्‍हा रुग्‍णालयात दोन रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमधील तीन रुग्‍णांचा संशयितांमध्ये समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police: भाडेकरुंमुळे अडचणीत आले पुण्यातले घरमालक! 76 जणांवर गुन्हे दाखल; 'या' चुका पडल्या महागात

Milk Adulteration : दूध भेसळ प्रकरण भरकटविण्याचा डाव; देवदत्त निकम यांच्यावरचे आरोप समर्थकांनी फेटाळले

Latest Marathi News Live Update : पुण्यातील कोथरूड कथित भोंदू बाबा प्रकरणात मुख्य आरोपी दीपक खडकेचा जामीन पुणे न्यायालयाकडून रद्द

LPG New Rule: गॅस ग्राहकांसाठी 16 ऑगस्टची डेडलाईन! eKYC न केल्यास रिफिल आणि सबसिडीवर परिणाम; घरबसल्या eKYC कशी कराल?

Vasai Virar Protest : हक्काच्या जागा, ओळखपत्रांसाठी फेरीवाल्यांचा वसई-विरार महापालिकेवर बेमुदत मोर्चा; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT