Nashik : तिसऱ्या लाटेसाठी दोन लाख ॲन्टिजेन किट खरेदी sakal News
नाशिक

Nashik : तिसऱ्या लाटेसाठी दोन लाख ॲन्टिजेन किट खरेदी

स्थायी समितीकडून मान्यता; वादग्रस्त विषयावर चर्चा नाही

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी वैद्यकीय विभागाने सादर केलेल्या दोन लाख रॅपिड ॲन्टिजेन किट खरेदीला स्थायी समितीने शुक्रवारी (ता.१) मान्यता दिली. मागील वर्षी ५०४ रुपये दराने खरेदी केलेल्या वादग्रस्त विषयावर मात्र चर्चा झाली नाही.

मागील वर्षाच्या मार्च महिन्यात देशात कोरोनाची लाट सुरू झाल्यानंतर तातडीची बाब म्हणून रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट किट खरेदी करण्यात आली. पहिल्या व दुसऱ्या लाटेत पाच लाख २, ७५० रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट किट खरेदी करण्यात आल्या. नव्या किट खरेदीसाठी काढण्यात आलेल्या निविदेत दरामध्ये जवळपास दहापट तफावत आढळली. मागील वर्षी ५०४ रुपये किमतीला प्रत्येकी एक रॅपिड ॲन्टिजेन किट खरेदी करण्यात आले. महापालिकेने तिसऱ्या लाटेसाठी पुन्हा एकदा ॲन्टिजेन टेस्ट खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर ४५ रुपये किमतीला एक किट उपलब्ध झाल्याने किटच्या किमतीमधील तफावतीवरून संशय निर्माण झाला आहे. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत जुन्या वादग्रस्त खरेदीवर चर्चा होणे अपेक्षित असताना त्यावर सदस्यांनी मौन बाळगले. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी नव्याने दोन लाख किट खरेदीला मात्र मान्यता देण्यात आली.

महापौरांच्या प्रभागात बंदिस्त नाला

पदाचा कार्यकाळ संपुष्टात येत असताना महापौर सतीश कुलकर्णी यांच्या प्रभाग २३ मध्ये मोठ्या प्रमाणात कामांचा धडाका लावला आहे. रविशंकर मार्गावरून जाणाऱ्या नैसर्गिक नाल्या बंदिस्त केला जात असल्याने काँग्रेसचे नगरसेवक राहुल दिवे यांनी प्रस्तावाला विरोध केला. नैसर्गिक नाला बंदिस्त करता येत नाही. बंदिस्त करायचा असेल तर हा नाला प्रभाग क्रमांक १६ मधून पुढे वाहत असल्याने तोदेखील बंदिस्त करण्याची मागणी त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vagdevi idol: १५० वर्षांपूर्वी इंग्लंडला गेलेली वाग्देवी मूर्ती पुन्हा भारतात येणार?, वाग्देवीची मूर्ती कोहिनूरपेक्षाही मोलाची..

Horoscope : आजपासून बदलणार 4 राशींचं नशीब ! नव्या नोकरीने सुरु होणार सुवर्णकाळ; फक्त पैसाच नाही प्रॉपर्टीही मिळणार

Chemists Strike India : औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, १५ लाखांहून अधिक मेडिकल्स बंद राहणार; महाराष्ट्रात काय असेल स्थिती? जाणून घ्या

El Nino Monsoon: ‘एल निनो’ रोखणार मॉन्सूनची वाटचाल; पर्जन्यमान घटणार, कृषीला फटका शक्य..

सोलापूर शहरात चोऱ्या- घरफोड्या! पोलिस म्हणतात, नागरिकांनी ‘या’ ११ सूचना पाळल्यास कधीच होणार नाही चोरी; डायल ११२ अन्‌ १९३० हे क्रमांक सेव्ह करुन ठेवा

SCROLL FOR NEXT