Cotton News
Cotton News esakal
नाशिक

Nashik Cotton Crop Crisis: ‘व्हाइट गोल्ड’ची क्षेत्रवाढ; पण उत्पादन घटणार! जिरायतीला फटका

महेंद्र महाजन

Nashik Cotton Crop Crisis : राज्यातील ‘व्हाइट गोल्ड’ (कापूस) क्षेत्र गेल्या वर्षीपेक्षा पाच हजार २६० हेक्टरनी वाढले असून, यंदा ४२ लाख ३४ हजार ४७३ हेक्टरवर लागवड झाली आहे.

ही परिस्थिती असली, तरीही अपुऱ्या पर्जन्यवृष्टीमुळे जिरायती क्षेत्रातील उत्पादनात घट येईल. पुरेशा पावसाअभावी अनेक ठिकाणी पिके करपली आहेत.

काहींनी उपटून फेकून दिले आहे. त्यामुळे यंदा उत्पादन घटणार असून, त्याचा फायदा कृषी विभागाने नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशीम, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यांतील काही महसूल मंडलात प्रतिकूल परिस्थितीत लागू पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पादनाचा अंदाज वर्तविला आहे. (Nashik Cotton Crop Crisis Expansion of White Gold But production will decrease)

स्मार्ट प्रकल्पांतर्गत बाजार माहिती विश्‍लेषणाद्वारे अकोल्यात ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये क्विंटलला साडेसात हजार ते साडेआठ हजार रुपये असा भाव राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

येथे ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान २०२० मध्ये पाच हजार २५७, २०२१ मध्ये सात हजार ९३९, तर गेल्या वर्षी आठ हजार ७६२ रुपये क्विंटल असा भाव राहिला आहे. बागायत क्षेत्रातील कपाशीची वेचणी सुरू झाली असून, शेतकऱ्यांनी कपाशी विक्रीस आणण्यास सुरवात केली आहे.

यावल (जळगाव) येथे सहा हजार ३५०, आर्वीत सात हजार २८०, खामगावमध्ये सहा हजार ९००, तर पुलगावमध्ये सात हजार २७५ रुपये क्विंटल भावाने कापसाची विक्री झाली आहे.

रोग-किडीने जर्जर

जिरायती क्षेत्रात बोंडे ते बोंडे पक्वतेच्या अवस्थेत कापूस आहे. त्यावर गुलाबी बोंड अळी, रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे.

कृषी विभागनिहाय यंदा कपाशीची लागवड झालेले क्षेत्र हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे असून, (कंसात गेल्या वर्षी लागवडीखालील क्षेत्र हेक्टरमध्ये दर्शविते) : नाशिक- ९ लाख ६५ हजार ९०० (१० लाख ३ हजार ६४०), पुणे- १ लाख ५५ हजार ९९६ (१ लाख ३३ हजार १९९), छत्रपती संभाजीनगर- ९ लाख ५६ हजार ३७७ (९ लाख ६९ हजार ४२३), लातूर- ४ लाख ३७ हजार ४०७ (४ लाख २ हजार ६८), अमरावती- १० लाख ८३ हजार ४५२ (१० लाख ७५ हजार ९५४), नागपूर- ६ लाख ३५ हजार ३९९ (६ लाख ४४ हजार १६७). कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने यापूर्वी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटकमध्ये कपाशीचे उत्पादन कमी होईल, असे स्पष्ट केले.

जागतिक कापूस उत्पादनाचा अंदाज (२०२३-२४ मध्ये)

० गेल्या वर्षीच्या तुलनेत किरकोळ वाढ

० ०.५ टक्के अथवा ६ लाख गाठी

० युनायटेड स्टेटमध्ये ११५ दशलक्ष गाठींच्या अधिक उत्पादनाची अपेक्षा

० चीन, तुर्कस्तान, पाकिस्तानमध्ये कमी उत्पादन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT