Cotton Export  
नाशिक

Cotton Export : कापसाच्या अतिरिक्त निर्यातीची गरज

क्विंटलला १० हजार भाव अपेक्षित

शशिकांत पाटील

न्यायडोंगरी (जि. नाशिक) : आंतरराष्ट्रीय बाजारात एक खंडी रुईचा भाव म्हणजे १७० किलोच्या कापसाच्या दोन गाठींचा भाव ६५ हजार रुपयांपर्यंत घसरला आहे. भारतीय कापसाला त्यातुलनेत पाच ते सात टक्के इतका अधिक भाव आहे. त्यामुळे इतर देशांचा कापूस स्वस्त मिळत असल्याने कापसाची निर्यात थंडावली आहे. त्यामुळे भारतीय कापड व वस्त्रोद्योगास गरजेपेक्षा अधिक ठरणाऱ्या किमान ५० लाख कापूस गाठींची निर्यात आवश्‍यक बनली आहे.

देशांतर्गत बाजारात कापसाला ८ हजार ५०० ते ८ हजार ८०० रुपये क्विंटल असा भाव मिळत आहे. खरीप हंगामात विविध संकटांचा सामना करत उत्पादन खर्च वाढला आहे. वेचणी खर्च सरासरी १२ रुपये किलोपेक्षा अधिक पडत आहे. त्यामुळे कापसाचा हमीभाव हा विषय कालबाह्य ठरला आहे. कापसाला किमान दहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. कमी दराने शेतकरी कापूस विकण्याच्या मनःस्थितीत नाहीत.

दुसरीकडे जिनिंग व प्रेसिंग यांना पुरेसा कापूस मिळत नसल्याने त्याही थंडावल्या आहेत. ही कोंडी गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर तेथील कापूस व्यापार सुरळीत झाल्यानंतर फुटण्याची शक्यता आहे. अतिरिक्त कापूस उत्पादनास निर्यातीद्वारे समतोल साधण्याच्या धोरणाने कापूस उत्पादकांना तारले आहे.

टेक्स्टाईल पार्क घोषणेचे संकेत

केंद्र सरकारच्या पंतप्रधान मित्र योजनेतंर्गत राज्यात टेक्स्टाईल पार्क उभारणे अपेक्षित आहे. त्याद्वारे तीन लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. केंद्र सरकारच्या आगामी अर्थसंकल्पात टेक्स्टाईल पार्कची घोषणा होण्याचे संकेत आहेत.

साखरेचे अतिरिक्त उत्पादन झाल्यास आंतरराष्ट्रीय दरात समतोलासाठी केंद्र सरकारने वेळोवेळी अनुदान दिले आहे. त्याप्रमाणे कापसाच्या निर्यातीत अनुदान देणे गरजेचे आहे.

- विजय जावंदिया, शेतकरी नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT