Kapaleshwar temple esakal
नाशिक

Nashik Kapaleshwar Temple : कपालेश्वर मंदिरातील पाचही दानपेट्या होणार सील; धर्मदाय आयुक्त कार्यालयाला न्यायालयाचे आदेश

Kapaleshwar Temple : गुरव समाजाने ठेवलेल्या पाचही दानपेट्या धर्मदाय आयुक्त कार्यालयाने सील कराव्यात, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : येथील श्री कपालेश्वर महादेव मंदिरातील देवस्थानात विश्‍वस्तांसह गुरव समाजाने ठेवलेल्या पाचही दानपेट्या धर्मदाय आयुक्त कार्यालयाने सील कराव्यात, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. या आदेशाने शहराच्या धार्मिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गुरव समाजाने मंदिरात ठेवलेल्या दानपेटीत टाकल्या जाणाऱ्या पैशांचा नेमका उपयोग कसा होतो, रोज किती पैसे जमा होतात, याचे कोणतेही ऑडिट अनेक वर्षांपासून झाले नसल्याचा आरोप कपालेश्वर देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडून दोन- तीन दिवसांपूर्वीच करण्यात आला होता. (Court orders charity commissioner office to seal all five donation boxes in Kapaleeshwar temple )

या दानपेटीतील रकमेवरून गुरव समाजात मोठा वादही झाला होता. भाविक अर्जदाराने या दानपेटीबाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेचा आधार घेत न्यायालयाने धर्मदाय आयुक्तांना मंदिरातील सर्व दानपेट्या सील करण्याचा आदेश दिला आहे. याबाबत या दानपेट्यांमधील जमा रकमेबाबतचा अधिकार धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे राहण्याची शक्यता आहे. (latest marathi news)

वादाची पार्श्‍वभूमी ठरली कारणीभूत

दानपेटीतील जमा पैशांवरून चार दिवसांपूर्वी गुरव कुटुंबातच आपसांत मंदिरात मोठा वाद झाला होता. या वादाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने दानपेटीचा हा वाद चांगलाच रंगला होता. याबाबत विश्‍वस्तांनी बैठक घेत याप्रकरणी आपली बाजू स्पष्ट केली होती. याबाबत भाविकांतही मोठी नाराजी व्यक्त झाली होती. आता एका भाविकाच्या याचिकेनंतर बुधवारी (ता. २५) न्यायालयाने दानपेट्या सील करण्याचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT