नाशिक

न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे कामकाज ठप्प

CD
सेकंड मेन फोटो : B18118, B18119 नाशिक रोड : मागण्यांसाठी येथील दिवाणी फौजदारी न्यायालयासमोर आंदोलन करताना कर्मचारी. दुसऱ्या छायाचित्रात कौटुंबिक न्यायालयासमोर आंदोलन करताना. -- सुधारित वेतनश्रेणीसाठी कर्मचारी आक्रमक नाशिक रोड न्यायालयासमोर जोरदार आंदोलन नाशिक रोड, ता. १७ : मुंबई उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्यातील दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी राज्यभरातील सुमारे ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे न्यायालयांचे नियमित कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असून, पक्षकार आणि वकिलांची मोठी गैरसोय होत आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे १३०० कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. नाशिक रोड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर तसेच कौटुंबिक न्यायालयासमोर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोरील आंदोलनात प्रमोद बोंदार्डे, सुनील बागुल, तुषार वडगुले, ज्ञानेश बागले, सुधीर बेदाडे, सुधीर खैरनार, पंकज शेंडे, मंगेश रोकडे आदी सहभागी झाले होते. कौटुंबिक न्यायालयातील प्रबंधक मंदा भुसार, प्रभारी प्रबंधक, लघुलेखक गुणवंत कोलते, दिया बर्वे, श्याम घुमरे, योगेश पाळदे, योगेश गायकवाड यांच्यासह वरिष्ठ लिपिक व कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. बेमुदत संपामुळे न्यायनिर्णय, पुरावे नोंदविणे, नवीन प्रकरणे दाखल करणे, पुढील तारखा देणे आणि संगणकीय कामकाज अशा विविध प्रक्रियांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पक्षकार, वकील आणि न्यायालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Election: उत्तर प्रदेशात काँग्रेसला हव्यात १०० हून अधिक जागा, नाराज अखिलेश किती जागा देणार?

Trump Modi Quad meeting: कणखर व्यक्तिमत्व! क्वाड नेत्यांच्या बैठकीत ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक

FDA अधिकारी बनून पानटपरीवर धाड, बोगस अधिकाऱ्यांचा पर्दाफाश, ६ जणांना अटक; २.६६ लाखांची रोकड जप्त

Dhoni Retirement: "तू आमचा थाला अन् कर्णधार नेहमीसाठीच राहशील...", ऋतुराज गायकवाडची धोनीसाठी भावूक पोस्ट

१३ वर्षांचा वनवास संपला! नागपुरात रंगणार महाराष्ट्र केसरीचा महासंग्राम; १३०० मल्ल दाखवणार कुस्तीचा दम, 'या' तारखेला आयोजन

SCROLL FOR NEXT