drowned  ESakal
नाशिक

Nashik News : सख्ख्या चुलत बहिणींचा बंधाऱ्यामध्ये बुडून मृत्यू! कातरणीची घटना, तिसरीला वाचविण्यात यश

Latest Nashik News : तिसऱ्या मुलीला वाचविण्यात यश आले आहे. या घटनेने कातरणी परिसरावर शोककळा पसरली आहे.

सकाळ वृत्तसेवा

येवला : कातरणी येथे धुणे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या चुलत बहिणींचा गुरुवारी (ता.३) सायंकाळी पाचच्या सुमारास बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. तिसऱ्या मुलीला वाचविण्यात यश आले आहे. या घटनेने कातरणी परिसरावर शोककळा पसरली आहे. (cousins ​​drowned in dam at katarni)

कातरणी-विसापूर रस्त्यावर गावालगत असलेल्या बंधाऱ्याच्या बाजूला पाचशे फुटांवर दत्तू सोनवणे यांची वस्ती आहे. या बंधाऱ्यालगत त्यांच्या मुली शेळ्या चारण्यासह धुणे धुण्यासाठी नेहमी जात असतात. गुरूवारी सायंकाळी दत्तू सोनवणे यांच्या मुली कल्याणी, तेजल, आदिती तसेच बंधू सोमनाथ सोनवणे यांची मुलगी ऋतुजा या बंधाऱ्याकडे धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या.

पाचवीत शिकणारी ऋतुजा सोमनाथ सोनवणे (वय११) आणि सहावीत शिकणारी कल्याणी दत्तू सोनवणे (वय१२) यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बंधाऱ्याच्या पाण्यात बुडाल्या. आपल्या बहिणी बुडत असल्याचे पाहून तेजल (१४) हिने पाण्यात उतरून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तीही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली.

याच दरम्यान रस्त्याने जाणाऱ्या ग्रामस्थांनी तिला पाण्यातून बाहेर काढले. इतर दोघीही बुडाल्याचे उशिरा लक्षात आल्याने त्यांना बाहेर काढेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. पाण्यातून काढलेल्या तेजल हिच्यावर ग्रामस्थांनी प्राथमिक उपचार व पोटातून पाणी काढून तातडीने मनमाड येथे डॉ. शिंगी यांच्या रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे तिची तब्येत सध्या व्यवस्थित आहे. (latest marathi news)

वर्षातील दुसरी घटना

गरीब शेतकरी कुटुंबातील या मुली गावातीलच प्राथमिक तसेच माध्यमिक विद्यालयात शिकत होत्या. या घटनेने संपूर्ण गावातून शोक व्यक्त होत आहे. दरम्यान रात्री नऊच्या दरम्यान कातरणी येथे शोकाकूल वातावरणात या मुलींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, सोमनाथ सोनवणे यांचा अडीच वर्षाचा मुलाचा देखील आठ महिन्यापूर्वीच झोळीतून पडून मृत्यू झाला होता. वर्षाच्या आतच घरात दुसरी घटना घडल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mango Price Drop : आंब्याच्या दरात घसरण! ८० हजार पेट्यांची आवक, अक्षय तृतीयेला आंबा खवय्यांची हापूस मेजवाणी

Jamakhed Crime: हॉटेलचालकासह पित्‍याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जामखेड तालुक्यातील घटना, मुलगी तीन महिन्यांची गर्भवती!

Latest Marathi News Live Update: रोहित शेट्टी फायरिंग प्रकरण चार महिन्यापासून फरार आरोपीला उत्तरप्रदेश मधून अटक

अमरावती प्रकरणात फक्त दोन मुलींचे व्हिडीओ; अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालात धक्कादायक माहिती, नवनीत राणांनाही फटकारलं...

Black Magic Scam : 'तुझ्या दीराचा आत्मा घरात आहे..'; भीती दाखवून महिलेला भारत-पाक सीमेपर्यंत नेलं, भोंदूसह पोलिस पत्नीचा अजब कारनामा, 11 लाखांचा गंडा

SCROLL FOR NEXT