Crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : चाडेगाव गोळीबार प्रकरणी दोघांना अटक

Nashik Crime News : चाडेगाव फाटा येथील गोळीबार प्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी दोघांना अटक केली असून, अद्यापही मुख्य संशयित सचिन मानकर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : चाडेगाव फाटा येथील गोळीबार प्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी दोघांना अटक केली असून, अद्यापही मुख्य संशयित सचिन मानकर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. चाडेगाव गोळीबार प्रकरणात नाशिक रोड पोलिसांनी सतीश सांगळे, सूरज वाघ या दोघांना अटक केली असून, मुख्य संशयितासह अन्य अद्यापही फरारी आहेत. (Nashik Crime 2 arrested in Chadegaon firing case)

चाडेगाव येथील काशाई यात्रोत्सवासाठी घेण्यात आलेल्या बैठकीनंतर चाडेगाव फाटा येथे संशयित सचिन मानकर याने फिर्यादी व त्याचा चुलत भाऊ ज्ञानेश्वर मानकर याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यात एक गोळी ज्ञानेश्वरच्या पाठीत घुसली. खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून, या प्रकरणी नाशिक रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक रोड पोलिसांनी या प्रकरणी संशयित सूरज वाघ आणि सतीश सांगळे या दोघांना अटक केली आहे; तर सचिन मानकर याच्यासह नाना हुळहुळे, महेंद्र मानकर, गोकुळ मानकर, आकाश पवार, अमोल नागरे, नंदू नागरे हे संशयित फरारी आहेत. मुख्य संशयित सचिन मानकर हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्या विरोधातील गुन्ह्यांची माहिती संकलित केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

SC-ST-OBC आरक्षणात नवा उप-कोटा? सर्वोच्च न्यायालयात केंद्राने मांडली भूमिका, आय आधारित उप-कोट्याला विरोध

School Stabbing Incident: देवगाव रंगारीत शाळेत दहावीच्या विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने हल्ला; चौघे जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Nashik Village Water Crisis: खाजगी जमिनीच्या वादामुळे दसाने गावाचा पाणीपुरवठा ठप्प; संतप्त महिलांचा हंडा मोर्चा, ग्रामपंचायतीला कुलूप

राज्यात ३०,२०९ शिक्षकांची भरती! जिल्हा परिषदेच्या शाळांमधील १३,३५१, तर खासगी शाळांमधील १२,१४८ पदे; १९ हजार ८८१ शिक्षकांना मिळणार थेट नियुक्ती

SCROLL FOR NEXT