Officers and staff of Crime Branch Unit One after arresting the mobile thieves. esakal
नाशिक

Nashik Crime News : आंध्र प्रदेश, तमिळनाडूच्या चोरट्यांकडून 22 मोबाईल जप्त

Nashik Crime : आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथील मोबाईल व लॅपटॉप चोरी करणारी टोळी नाशिकमध्ये आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : पंचवटी परिसरातील तेजस्त्री अपार्टमेंटमधील एकाच फ्लॅटमधून पाच मोबाईलची चोरी झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेत चोरट्यांचा शोध सुरु केला असता आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथील मोबाईल व लॅपटॉप चोरी करणारी टोळी नाशिकमध्ये आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचत गुरुवारी (ता.६) तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन लाख ३८ हजार रुपये किमतीचे २२ मोबाईल जप्त केले आहेत. ( 22 mobile phones seized from thieves in Andhra Pradesh Tamil Nadu )

आंध्र प्रदेश व तमिळनाडूतून आलेले चोरटे देवळाली गाव परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. चोरी केलेले मोबाईल सुभाष रोड भागातील वाघ चौक भागात विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागूल, हवालदार प्रवीण वाघमारे, विशाल काठे, प्रदीप म्हसदे, संदीप भांड, शरद सोनवणे, नाजीम पठाण, विशाल देवरे, जगेश्‍वर बोरसे, अमोल कोष्टी, समाधान पवार यांच्या पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.

इंद्रा डुमप्पा (कोटामंडल, जि. चित्तूर, आंध्र प्रदेश), बालाजी सुब्रमणी (रा. थोटामल, जि. त्रिपथूर, तमिळनाडू), दुर्गेश कृष्णमूर्ती (व्यंकटगिरी कोट्टा, जि. चित्तूर, आंध्र प्रदेश) अशी या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून हस्तगत केलेले २२ मोबाईल पंचवटी पोलिस ठाण्यात जमा केले आहेत. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT