Thieves bent shutters of grocery and gold shops esakal
नाशिक

Nashik Crime News : नांदूर शिंगोटेत 3 सराफी दुकान फोडली; सराफी दुकानाचे शटर वाकवून चोरी सीसीटीव्हीत

Nashik Crime : नांदूर-शिंगोटे परिसरात डिझेल चोरीची घटना ताजी असताना सोमवारी रात्री तीन ते साडे तीन दरम्यान तीन सोन्याच्या दुकाने लक्ष बनविली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : नांदूर-शिंगोटे परिसरात डिझेल चोरीची घटना ताजी असताना सोमवारी रात्री तीन ते साडे तीन दरम्यान तीन सोन्याच्या दुकाने लक्ष बनविली. मात्र सुदैवाने त्यातील दोन दुकाने शटर तोडण्यास चोरटे यशस्वी झाले तर एका दुकानाचे शटर तोडून किरकोळ माल लंपास तर एक किराणा दुकान फोडून सहा ते सात हजार रुपये रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाल्याची घटना घडली नांदूर-शिंगोटे येथील ग्रामपंचायत व्यापारी संकुलात सोन्याची दुकाने असून या ठिकाणी अंबिका ज्वेलर्स या दुकानाचे शटर तोडून चोरीचा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद झाला. ( 3 Sarafi shops were broken into in Nandur Shingote )

अंबिका ज्वेलर्सचे संचालक सुबोध माळवे यांचे दुकान फोडण्यात चोरटे यशस्वी झाले. त्याला लागूनच असलेले साई ज्वेलर्स जितेश माळवे यांच्या दुकानाचे शटर तोडण्यातही चोरटे अयशस्वी झाल्याचे प्रत्यक्ष सीसीटीव्ही मध्ये कैद झाले. सीसीटीव्ही मध्ये तीन चोरटे दिसत असून यामध्ये एकाच्या हातात काहीतरी गोणी दुसऱ्याच्या हातात कटावणी इतर दिसून आली. याठिकाणी चोरटे सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर शेजारीच असलेल्या ए बी ज्वेलर्स बाळासाहेब माळवे यांच्या दुकानाचे शटर तोडण्यात चोरटे यशस्वी झाले.

मात्र या दुकानात किरकोळ वस्तू वगळता काही त्यांच्या हाती लागले नाही तर त्यानंतर त्यांनी मारुती मंदिरालगत असलेल्या दिलीप पठारे यांच्या दर्शन किराणा दुकानाचे शटर कटावणीने तोडून दुकानातील गल्ल्यातील रोख रक्कम सहा ते सात हजार चोरून नेला. मध्यरात्री तीन च्या दरम्यान तेथून जवळच राहणाऱ्या दर्शन किराणाचे मालक दिलीप पठारे यांचे बंधू अनिल पठारे यांना मुंबईला जायचे म्हणून लवकर उठल्यावर त्यांना दुकानाच्या ओट्यावर तीन चोरटे गप्पा मारताना आढळले.

त्यांची चाहूल लागताच तिघे बॉक्सर मोटरसायकल वरून पळून गेले. त्यानंतर त्यांनी आरडा ओरड करून सर्वांना जागे केले. चोरट्यांना एवढे मोठी दुकाने फोडूनही काही जास्त घबाड हाती लागले नाही हे उघड झाले असून नांदूर शिंगोटे मध्ये एकाच रात्री चार ते पाच चोरी सत्रामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे आहे. रात्री पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : : खरीप हंगामात डीएपी या रासायनिक खताची टंचाई; पावसामुळे मशागतीची कामे ठप्प

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT