Suspects arrested in Nashik old vehicle arson incident. Neighboring police officers, staff. esakal
नाशिक

Nashik Crime News : वाहन जाळपोळीच्या घटनेतील 5 जणांना अटक

Nashik News : जुने नाशिक भागातील तीन विविध ठिकाणी वाहन जाळपोळीची घटना घडून आठ दिवस उलटले असले तरी जाळपोळीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जुने नाशिक भागातील तीन विविध ठिकाणी वाहन जाळपोळीची घटना घडून आठ दिवस उलटले असले तरी जाळपोळीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र पोलिसांनी यातील तीन संशयित यांना शनिशिंगणापूर तर दोघांना शहरातून अटक केली. मुख्य संशयित अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. (5 people arrested in incident of vehicle arson)

गुरुवारी (ता.१६) रोजी रात्री सव्वातीनला सहा संशयितांकडून तीन विविध ठिकाणी दहशत माजविण्याचा प्रयत्न करत १५ वाहने जाळली होती. या घटनेनंतर भद्रकाली गुन्हे शोध पथक संशयितांच्या मागावर होते. मात्र, सीसीटीव्ही फुटेज व्यतिरिक्त कुठलाही ठोस सुगावा पोलिसांकडे नव्हता.

मोबाईल लोकेशन, तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांची माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला असता शनिशिंगणापूर येथे संशयितांचे लोकेशन दिसून येत होते. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलिस निरीक्षक संतोष नरुटे, विक्रम मोहिते यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक गुन्हे सत्यवान पवार.

पोलिस उपनिरीक्षक यशवंत गांगुर्डे, हवालदार नरेंद्र जाधव, सतीश साळुंखे, संदीप शेळके तसेच कय्युम सय्यद, लक्ष्मण ठेपणे, अविनाश जुंद्रे, महेश बोरसे, नितीन भामरे, नारायण गवळी, सागर निकुंभ, धनंजय हासे, नीलेश विखे, योगेश माळी, दयानंद सोनवणे, जावेद शेख यांनी शनिशिंगणापूर येथे सापळा रचून सनी संजय गावडे (वय.२८,रा. पिंपळे गल्ली म्हसरूळ), प्रशांत बाळासाहेब फड (वय.३१,रा. विद्यानगर मखमलाबाद).

प्रवीण बाळू कराटे (वय.२४,रा. विद्यानगर मखमलाबाद) तिघांना ताब्यात घेतले. तर शहरातून आकाश राजू साळुंके,(वय.२४,रा. दत्त चौक सिडको), विजय सुरेश लोखंडे (वय.२८,रा. आडगाव) अशा पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली केली असता गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी दिली.

सुपारी घेऊन जाळपोळ ?

भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पाचही संशयितांची चौकशी करण्यात आली. मात्र त्यांनी जाळपोळ का केली पूर्णपणे सांगितले नाही. जाळपोळीनंतर आम्हाला पैसे मिळणार होते. अद्याप पैसे मिळालेले नाही. अशी कबुली संशयितांनी पोलिसांना दिली. या घटनेतील मुख्य संशयित अद्याप फरार आहे. त्याची अटक होताच आगीचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कमर्शियल LPG मध्ये मोठा बदल! आता १० किलोचे सिलेंडर मिळणार; व्यावसायिकांची अडचण दूर होणार

IND vs ENG 1st ODI: ५-२-३-१... टीम इंडियाचा फॉर्म्युला ठरला; इंग्लंडला सव्याज परतफेड करणारी तगडी प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update : तुकाराम मुंढेंना पांडुरंगाच्या महापूजेचा मान मिळावा; सत्यशोधक वारकरी महासंघाची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी

Jalna: वारकऱ्यांसाठी दहा वर्षांपासून अखंड जलसेवा; संदीप कंटुले यांच्याकडून माउलीच्या पालखीत टँकरद्वारे मोफत पाणी

Karnataka SIR Campaign : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक राहत होते कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान धक्कादायक प्रकार उघड, 'त्या' कुटुंबाचं दुबई कनेक्शन काय?

SCROLL FOR NEXT