Crime  esakal
नाशिक

Nashik Crime news : लघुशंकेला हटकल्याने वयस्काला बेदम मारहाण! शहरातील ‘स्ट्रीट क्राईम’ थांबविण्याचे पोलिसांसमोर आव्हान

Nashik News : जेलरोड येथील पाण्याच्या टाकीजवळ लघुशंका करणाऱ्या तरुणाला हटकले असता, त्याने ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला हत्याराने मारून दुखापत केल्याची घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जेलरोड येथील पाण्याच्या टाकीजवळ लघुशंका करणाऱ्या तरुणाला हटकले असता, त्याने ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला हत्याराने मारून दुखापत केल्याची घटना घडली. तर याचप्रमाणे आयुक्तालय हद्दीमध्ये मारहाणीच्या पाच घटना घडल्या असून, कुरापती काढून मारहाणीच्या घटना सतत घडत आहेत. यामुळे पोलिसांसमोर स्ट्रीट क्राईमचे आव्हान उभे राहिले आहे. (66 year old senior citizen was hit and injured by weapons by youth)

अजय अशोक सिंग ऊर्फ सोनू शिंग्या (२६, रा. वैभव शांती अपार्टमेंट, मॉडेल कॉलनी, जेलरोड) असे संशयिताचे नाव आहे. विजय नानाजी गांगुर्डे (रा. परिवर्तन बंगला, चंपानगरी, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, सदरचा प्रकार शुक्रवारी (ता. २४) रात्री नऊला घडला. याप्रकरणी संशयिताने शिवीगाळ व मारहाण करीत काहीतरी हत्याराने मारून दुखापत केली.

याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल असून, संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. जुना गंगापूर नाका येथे मंगलवाडीत युवकाला घराबाहेर बोलाविले आणि कुरापत काढत ट्यूबलाईटने मारून दुखापत केली. प्रतीक बाबासाहेब लांडगे (२०, रा. साईदर्शन अपार्टमेंट, सावरकरनगर, गंगापूर रोड) असे संशयिताचे नाव आहे. प्रथमेश वाघ (रा. मंगलवाडी, जूना गंगापूर नाका) या युवकाच्या फिर्यादीनुसार, सदरचा प्रकार रविवारी (ता. २६) घडला आहे.

संशयिताने प्रथमेशला घराबाहेर बोलावून घेत माझे घड्याळ दे अशी कुरापत काढून ट्यूबलाईटने मारून दुखापत केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडकोतील सरस्वती विद्यालयाजवळ तिघा संशयितांनी संगनमत करून एकाला बेदम मारहाण करीत दुखापत केली. संजय पवार, स्वप्नील पवार, प्रवीण पवार (सर्व रा. अंबड) अशी संशयितांची नावे आहेत.

विनायक दिलीप शेवरे (रा. पाटीलनगर, सिडको) याच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (ता. २५) रात्री साडेनऊला संशयितांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच, एकाने त्याच्या हातातील कड्याने मारून दुखापत केली. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोरेवाडीतील शास्त्रीनगरमध्ये तिघा संशयितांनी मागील भांडणाची कुरापत काढून एकाला लोखंडी गजाने मारून दुखापत केली आहे. आकाश कैलास पगारे (२७), जयेश कैलास पगारे (२४), सागर तुकाराम जेडगुले (२५, सर्व रा. शास्त्रीनगर, गोरेवाडी, उपनगर) अशी संशयितांची नावे आहेत.

मनोज राम फड (रा. शास्त्रीनगर, गोरेवाडी) यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (ता.२५) मध्यरात्रीच्या सुमारास संशयितांनी मनोज याच्याशी मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर संशयिताने लोखंडी गजा मनोजला मारहाण केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात मारहाणीसह शस्त्राचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

SCROLL FOR NEXT