9 cows that were driven to slaughter in pick up esakal
नाशिक

Nashik Crime News : पिकअप मध्ये डांबून कत्तलीसाठी चाललेल्या 9 गायींची सूटका!

Nashik News : पिकअप मध्ये डांबून कत्तलीसाठी चाललेल्या नऊ गायींची सूटका वाद तालुका चांदवड येथील ग्रामस्थांनी केली आहे.

भाऊसाहेब गोसावी - सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पिकअप मध्ये डांबून कत्तलीसाठी चाललेल्या नऊ गायींची सूटका वाद तालुका चांदवड येथील ग्रामस्थांनी केली आहे. पहाटे पाच वाजेच्या सुमारास अतिवेगाने मालेगाव मनमाड महामार्गाच्या दिशेने जात असलेली पिकअप गाडी ग्रामस्थांना दिसली. आपला पाठलाग होत असल्याचे लक्षात आल्यानंतर चालकाने काही मिनिटांतच ती गाडी परत फिरून झाडीच्या दिशेने फिरवली. (9 cows that were driven to slaughter in pick up)

पुढून गाडी अडवली जाऊ शकते या भितीने चालक गाडी आडमार्गाने टाकून गाडी सोडून फरार झाला. वाद येथील सरपंच प्रविण आहेर, पोलीस पाटील दिनकर आहेर, रमण हारपडे , शिवाजी खताळ, काळू वाकचौरे आदी ग्रामस्थांनी तात्काळ या गाडीचा शोध घेत गायींची सूटका केली. अत्यंत निर्दयपणे कोंबून भरलेल्या या गायींची अवस्था पाहून ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.

या घटनेची माहिती पोलिस पाटील दिनकर आहेर यांनी चांदवड पोलिसांना दिल्यानंतर गायींसह पिकअप चांदवड पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली. (latest marathi news)

यावेळी पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी तात्काळ पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेत गायींवर उपचार केले.

या सर्व गायी गोशाळेत पोहोचवणार असून याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT