Jailed esakal
नाशिक

Nashik Crime : अंबडमधील खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला जन्मठेप! तिघांची निर्दोष मुक्तता

Crime News : अंबड लिंकरोड परिसरातील आशीर्वादनगरमध्ये एकाचा दोरीने गळा आवळून पंख्या लटकावून ठार मारल्याप्रकरणी आरोपीला जन्मठेप व १८ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अंबड लिंकरोड परिसरातील आशीर्वादनगरमध्ये एकाचा दोरीने गळा आवळून पंख्या लटकावून ठार मारल्याप्रकरणी आरोपीला जन्मठेप (Life Sentence) व १८ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या गुन्ह्यातील अन्य तिघांची जिल्हा न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. सदरची घटना २०१९ मध्ये घडली होती. (Nashik Crime Ambad link road murder case marathi news)

गोपाल शेखर कुमावत (३२, रा. पांडुरंग कृपा रो हाऊस, आशीर्वादनगर, अंबड-सातपूर लिंकरोड) असे जन्मठेप सुनावण्यात अलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, रमेश दगा वानखेडे यांना आरोपीने ठार मारले होते.

२९ ऑक्टोबर २०१९ रोजी मयत रमेश वानखेडे हा आरोपी गोपाल कुमावत याच्या पत्नीला इशारे करतो या कारणावरून गोपाल कुमावत याच्यासह शेखर बंडू कुमावत (रा. साईश्रद्धा रो हाऊस, आशीर्वादनगर), शुभम शेखर कुमावत (१९), लखन शेखर कुमावत यांनी मयत रमेश यास घराबाहेर बोलावून बेदम मारहाण केली.

यावेळी नागरिकांनी सोडवून केल्यानंतर आरोपीने काही वेळांनी मयत रमेश याच्या घराच्या टेरेसवर गेला आणि त्याने रमेशचा दोरीने गळा आवळून त्यास ठार मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यास घरातील पंख्याला लटकावले. याप्रकरणी अंबड पोलिसात चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Latest Marathi News)

गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक एम.डी. म्हात्रे यांनी करीत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सदरचा खटला जिल्हा प्रधान न्यायधीश एस.डी. जगमलानी यांच्यासमोर चालला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. शिरीष कडवे यांनी कामकाज पाहिले.

आरोपी गोपालविरोधातील पुरावे सिदध झाल्याने न्यायालयाने त्यास जन्मठेप व १८ हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली तर, उर्त्तरित तिघांना पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार संजय शिंदे, सहायक उपनिरीक्षक अण्णा कुवर यांनी पाठपुरावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पुणेकरांची दिवाळी यंदा धूमधडाक्यात! फटाक्यांची दुकानं राहणार २४ तास खुली

Arya Chavan: आर्या चव्हाणच्या मारकऱ्याला फाशीच द्या! 'सातारा सकल मराठा क्रांती मोर्चासह ग्रामस्‍थ आक्रमक'; खटला जलदगती न्‍यायालयात चालवा

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतून ठरणार रोहित-विराटचं भवितव्य? माजी प्रशिक्षकाच्या विधानानं खळबळ...

Quick Breakfast Idea: प्रोटिनने भरपूर, चवीला मस्त! सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा खुसखुशीत बटर गार्लिक पनीर

मोठी बातमी! दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची ग्वाही, पण ३३ पैकी ५ जिल्ह्यांचेच पंचनामा अहवाल अंतिम; शेतकऱ्यांसाठी ३१,६२८ कोटींचे पॅकेज, पण...

SCROLL FOR NEXT