Police File photo esakal
नाशिक

Nashik Police : टवाळखोरांना पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसाद! मोकळ्या मैदानांवर शहर पोलिसांचे ‘सर्च ऑपरेशन’

Crime News : शहर पोलिसांनी आयुक्तालय हद्दीत सर्च ऑपरेशन राबवून सुमारे ५०० टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police : मोकळी मैदाने, क्रीडांगणे अन्‌ उद्यानांमध्ये पार्ट्या करीत मौजमस्ती करीत धिंगाणा घालणाऱ्यांसह चौका-चौकात टवाळखोरी करणार्यांना पोलिसांनी कारवाई करीत दंडुक्याचा प्रसाद दिला. शहर पोलिसांनी आयुक्तालय हद्दीत सर्च ऑपरेशन राबवून सुमारे ५०० टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली. (Nashik crime action to goons City Police marathi news)

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार अचानकपणे टवाळखोरांविरोधात कारवाई सुरू केली. या कारवाईमध्ये परिमंडळ एकमध्ये २८९ तर, परिमंडळ दोनमध्ये २०५ टवाळखोरांविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे.

परिमंडळ एकअंतर्गत सरकारवाडा, भद्रकाली, गंगापूर, आडगाव, म्हसरुळ, मुंबईनाका आणि पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस ठाणेनिहाय व शहर गुन्हेशाखेच्या पथकाने कारवाई केली तर, परिमंडळ दोनअंतर्गत अंबड, सातपूर, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड व देवळाली कॅम्प  या पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस ठाणेनिहाय व शहर गुन्हेशाखेच्या गुंडा व दरोडाविरोधी पथकांनी कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे मोकळ्या मैदाने, क्रीडांगणे, उद्यानांमध्ये टवाळखोरी करीत पार्ट्या करणार्यांना चाप बसला आहे. (latest marathi news)

कारवाईची आकडेवारी

परिमंडळ - १.......परिमंडळ-२........एकूण

२८९........२०५........४९४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT